‘PM मोदींसारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात..’, संजय राऊतांची जहरी टीका

ADVERTISEMENT

mp sanjay raut criticizes prime minister narendra modi as hypocrite and fake leader from Ram temple
mp sanjay raut criticizes prime minister narendra modi as hypocrite and fake leader from Ram temple
social share
google news

Sanjay Raut: खरी शिवसेना काय आहे ती बघायची असेल तर अनंत कान्हेरे मैदानावर या आणि पाहा असा थेट इशारा देत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ज्या राम मंदिरासाठी (Ram Mandir) संघर्ष केला, ज्या जिथे रामाची प्रतिष्ठापणा करायची होती, ते पाहून आनंद व्यक्त करायचा सोडून तुम्ही रडता काय असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू असल्याचे सांगत त्यांच्यावर घणाघातही केला.

ही नाटकं बंद करा

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राम मंदिराच्या प्रश्नावरून जोरदार हल्लाबोल केला. यावेळी नरेंद्र मोदी हे ढोंगी आणि खोटारडे नेते असल्याचे सांगत त्यांनी निवडणुका आल्या म्हणजे त्यांना रडू येते, तुमच्या डोळ्यात अश्रू येतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांना मोठं अश्वासन दिलं होते, मात्र ते अश्वासन काही पूर्ण झालं नाही. त्यानंतर ते पुन्हा नाशिकमध्ये आले तेव्हा त्यांनी झाडू मारण्याचं नाटक केलं मात्र तुम्ही झाडू काय मारता, तुम्ही पंतप्रधान आहात ही नाटकं कशाला करता असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा >> Ram Mandir: ‘या’ उद्योगपतीकडून राम मंदिराला 101 किलो सोनं दान, अब्जाधीश अंबानींनी काय दिलं?

मगरीचे अश्रू

राम मंदिराच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा दिवस उपवास केला. मात्र देशातील 40 कोटी जनता फुटपाथावर झोपते, 80 कोटी जनता उपाशी आहे, त्यांच्यासाठी तुमच्या डोळ्यात कधी अश्रू येत नाही. त्यामुळे रडण्याची आणि दाखण्याची सगळी नाटकं तुमची बंद करा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रामाने डोळे वठारले

पुलवामामध्ये 40 जवान शहीद झाले त्यावेळी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, महाराष्ट्रात 2 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो महिलांवर बलात्कार आणि अत्याचार होतात त्यावेळीही त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू का येत नाहीत असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील कारण रामाने त्यांच्यावर डोळे वठारले असतील म्हणून हे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

गद्दारांचे उखडून टाकू

खासदार संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी गद्दारांचे राज्य आले असले तरी ते आता असं काही उखडून टाकायचे आहे की, पुढील 50 वर्षात ते नाव वर येणार नाही असा धडा शिकवायचा आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Palghar: नातवाने घेतला आजीचाच जीव, कारण फक्त ती म्हणाली; पोरा…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT