विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणार का? मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं?

मुंबई तक

कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या आंदोलनावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On MPSC Protest
Devendra Fadnavis On MPSC Protest
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणार का?

point

मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं?

Devendra Fadnavis On MPSC Protest : मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य करताना, पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आंदोलनावर स्पष्ट भूमिका मांडली. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे ही बाब थेट राज्य सरकारच्या अधिकारात येत नाही. संविधानातील तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून केवळ राष्ट्रपतींनाच त्यांना हटवण्याचा अधिकार आहे, ही घटनात्मक प्रक्रिया सर्वांना माहिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

'अशा प्रकारची मागणी कोणत्या तत्त्वात बसते...'

पेपरफुटीची घटना घडली तेव्हा जे अध्यक्ष पदावरच नव्हते, त्यांना त्या प्रकरणासाठी जबाबदार धरून कोणतीही चौकशी न करता थेट हटवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारची मागणी कुठल्या तत्त्वात बसते, याचा विचार आंदोलकांनी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतरही राजकीय दृष्ट्या अशा गोष्टींचा ईगो करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, विवेकानंद पाटीलने नकार का दिला?

राज्यपालांकडे विनंती

असे असले तरी, राज्य सरकारला कोणालाही प्रोटेक्ट करायचे नाही आणि विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास तयार करणे हीच सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या अध्यक्षांसह पूर्वीच्या अध्यक्षांची आणि संपूर्ण आयोगाची चौकशी करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या संदर्भात न्यायिक आयोग स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे कालच विनंती केली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

'सरकार मागे-पुढे पाहणार नाही'

या चौकशीत किंवा न्यायिक आयोगाच्या निर्णयात संविधानाच्या आर्टिकल 317 (Article 317) प्रमाणे मिसकंडक्ट (गैरवर्तणूक) सिद्ध झाल्यास, राष्ट्रपतींकडे त्यांना हटवण्याची शिफारस करण्यास सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. या कारवाईनंतर पुढील सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.