Savarkar: उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी निर्णय घेतील; नाना पटोलेंचं विधान
nana patole On Uddhav Thackeray speech : मालेगावात झालेल्या शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
Nana Patole, Uddhav Thackeray, Rahul gandhi, Savarkar : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सावरकरांच्या मुद्द्यांवरून समोरासमोर आलेत. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं. (Nana Patel reply after uddhav thackeray hits back to rahul gandhi on Savarkar)
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींवर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. त्यावर नाना पटोले म्हणाले, “काँग्रेसचा विचार राहुल गांधींनी मांडला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचा विचार मांडला. दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत. दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे, पण विपरित परिस्थितीत आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये आलो.”
“उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा विचार मांडतात, राहुल गांधी आपल्या पक्षाचा विचार मांडतात. आता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे बसून निर्णय घेतील”, असं उत्तर नाना पटोले यांनी या मुद्द्यावर बोलताना दिलं.
हे वाचलं का?
वाचा – Uddhav Thackeray : सावरकरांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?
“काँग्रेसचा विचार लहान आहे, असं समजण्याचं कारण नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि आधी काँग्रेस विचाराने या देशाला उभं केले आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश घेऊन काँग्रेसने देशातीलप्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन हा देश मोठा केला आहे”, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.
सावरकरांवरुन उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं, म्हणाले… #UddhavThackeray #RahulGandhi #Savarkar pic.twitter.com/xh1drZYXSF
— Mumbai Tak (@mumbaitak) March 26, 2023
ADVERTISEMENT
“भाजप राहुल गांधींना माफी मागायला सांगत आहे. आम्ही लोकमान्य टिळकांचा विचार हा पुरोगामी आणि काँग्रेसचा विचार होता. मी शेंगा खाल्ल्याच नाही, तर मी टरफल कशाला फेकू, जेव्हा मी चूकच केली नाही. मी चोराला चोर म्हटलं, तर इथं वावगं काय? कशासाठी मी माफी मागू असं राहुल गांधींचं मत आहे”, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत राहुल गांधींची भेट घेणार, पटोले म्हणतात…
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपण राहुल गांधींची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावर नाना पटोले म्हणाले, “संजय राऊत राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी भेट घेतली पाहिजेत.”
सामना अग्रलेखातून राहुल गांधींवर टीका, नाना पटोलेंनी दिले उत्तर
सामना अग्रलेखातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. त्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, “त्यांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी वेगळी आहे. आम्ही हे सातत्याने सांगत आहोत. आम्ही कोणत्याही गोष्टी लपवल्या नाहीत. काँग्रेस हा देशातील जुना पक्ष आहे. सगळ्यांना माहिती आहे. कुणी काय बोलायचे हा त्याचा प्रश्न आहे. आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
वाचा – Shiv Sena UBT: “त्यासाठी सावरकर व्हा”, राहुल गांधींवर घणाघाती टीका
किमान समान कार्यक्रमात सावरकर हा विषयच नव्हता. आम्ही सर्वधर्म समभावाचा पुरस्कार आम्ही करतो. आम्ही कुठल्याही धर्माचा आणि व्यक्तीचा द्वेष करणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस विचारांशी तडजोड केली नाही,करणार नाही. सत्ता येतील जातील. प्रिन्सिपल सोबत तडजोड करणार नाही”, नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT