‘परत बसवायला काय गणपती आहे का?’,नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
शिंदे यांना उतरवणार आणि ठाकरेंना बसवणार, काय गणपती आहे का बसवायला, एकाला काढलं दुसऱ्याला बसवलं, तू राजीनामा दिलास आता दुसऱ्यांदा बसवण्याचा प्रश्न कुठेच येतो, असा हल्लाबोल देखील राणे यांनी ठाकरेंवर केला.
ADVERTISEMENT
Narayan rane Criticize Uddhav thackeray :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात अखेर निर्णय झाला. या निकालात महाराष्ट्रात शिंदे सरकार कायम राहणार असल्याची स्पष्टता मिळाली आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून आता विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता ठाकरेंचे कट्टर विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या पदावर राहणार हे निश्चित झालंय. या निकालाने बऱ्याच जणांना पोटसुळ सुरु झाल्याची टीका नारायण राणे यांनी केली. (narayan rane criticize uddhav thackeray on maharashtra politics verdict)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीतून 2019 ची निवडणूक लढवली.या निवडणूकीत भाजप-शिवसेनेला बहुमत मिळालं होतं. पण ते भाजपसोबत आले नाही.त्यांना वाटलं पवार साहेब मुख्यमंत्री पद देतील. नितिमत्ता, हिंदुत्वला सोडचिठ्ठी देत नैतिकता बोजवारा उडवणारे उद्धव ठाकरे आज नैतिकतेवर बोलतायत, नैतिकतेवर, निष्ठेवर आणि प्रामाणिकतेवर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणतात, ‘आपण नैतिकतेचा राजीनामा दिला’, लोकचं राहिली नाहीत,नैतिकतेचा काय द्यावा लागला. एकनाथ शिंदे 40 आमदार डोळ्यासमोरून घेऊन गेला, तेव्हा काही बोलला नाही, हिंमत नाही थांबवायची, असी टीका राणेंनी केली. शिंदे यांना उतरवणार आणि ठाकरेंना बसवणार, काय गणपती आहे का बसवायला, एकाला काढलं दुसऱ्याला बसवलं, तू राजीनामा दिलास आता दुसऱ्यांदा बसवण्याचा प्रश्न कुठेच येतो, असा हल्लाबोल देखील राणे यांनी ठाकरेंवर केला.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंना वाटलं नितिश कुमारसोबत बसलो, उठलो, मी झालो अखिल भारतीय.नाय..नाय..तू मातोश्री एके मातोश्री.मातोश्रीच्या बाहेर पण जागा नाही. उद्धव ठाकरेंचे क्षेत्र किती मातोश्री एवढेच, बाहेर नाही. त्यामुळे त्यांनी आता घरी बसावे, बोलू नये, बोललात तर हे सगळं बोलायची क्षमता ठेवावी,असा सल्ला देखील दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT