NCP: ‘आमचा पक्ष अजूनही…’, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं राजकारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp mp supriya sule has made a statement that our party is not divided
ncp mp supriya sule has made a statement that our party is not divided
social share
google news

Supriya Sule on NCP: शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी पडलेली असताना देखील ‘आमचा पक्ष दुभंगलेला नाही’ असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी थेट भाजपसोबत सत्तेत सामील होत बंडाचं निशाण फडकावलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. पण असं असतानाही ‘आमचा पक्ष दुंभगलेला नाही..’ असं विधान सुप्रिया सुळे यांनी आज (2 जानेवारी) शिर्डीत केलं आहे. (ncp mp supriya sule has made a statement that our party is not divided)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन तीन आणि चार जानेवारीला शिर्डीत पार पडतंय.. यासाठी खासदार सुप्रिया सुळे या आज शिर्डीत दाखल झाल्या.. यावेळी त्यांनी साई बाबांची धुपारती करुन दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘राष्ट्रवादी पक्ष दुभंगलेला नाही, यश-अपयश येत असतं तसच आमच्या आयुष्यात होत आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

हे ही वाचा>> Khadakwasla : ‘नानां’च्या उमेदवारीवरुन रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या, ‘अनेक अभिनेते आले, पण…’

‘मला दुसऱ्याच्या घरात डोकवायला वेळ नाही…’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पक्षीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक हलक्यात घेऊ नये. असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. याबाबत खास सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘निवडणूक सर्व पक्ष गांभीर्याने घेत असतो, मी भाजपाचा विचार करत नाही, सध्या राज्यात मोठी आव्हानं असताना आपण कशाला दुसऱ्याच्या घरात बघायचं.. मला काम कमी आहे का? शेतकरी प्रश्नावर आवाज उठवला तर माझं आणि अमोल कोल्हेंचं निलंबन झालं.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

हे वाचलं का?

पवार कुटुंब आणि राजकारण..

2022 साली शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर अत्यंत टोकाची टीका केली. वर्षभरानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. पण फूट पडल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या अनेकदा भेटी-गाठी होत राहिल्या. एकीकडे दोन्ही आपलीच राष्ट्रवादी खरी असा दावा केला जात आहे.

हे ही वाचा>> ‘राम मंदिर सोहळ्यानंतर काँग्रेस फुटणार, अन्…’, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

मात्र, असं असताना पवार कुटुंब हे सण, कार्यक्रम याच्या निमित्ताने एकत्र येताना दिसतात. तसेच पक्षात फूट नाही असा दावाही केला जात आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे असंच विधान केल्याने आता राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT