PM Modi Lok Sabha Speech Live: विरोधकांनी केलं PM मोदींना हैराण, सलग तासभर घोषणाबाजी का होती सुरू?

मुंबई तक

Parliament Session 2024: पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील भाषणादरम्यान जोरदार गोंधळ केला. मोदींच्या संपूर्ण भाषणादरम्यान, विरोधकांनी मणिपूरला न्याय द्या.. अशा घोषणाबाजी केल्या.

ADVERTISEMENT

 Narendra Modi salary Narendra Modi age Narendra Modi App Narendra Modi awards Narendra Modi Twitter Narendra Modi ka WhatsApp number Narendra Modi HD images Narendra Modi birthday
Narendra Modi salary Narendra Modi age Narendra Modi App Narendra Modi awards Narendra Modi Twitter Narendra Modi ka WhatsApp number Narendra Modi HD images Narendra Modi birthday
social share
google news

PM Modi Lok Sabha Speech Live: नवी दिल्ली: देशातील नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन हे अत्यंत वादळी ठरलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच विरोधक हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज (2 जुलै) विरोधकांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या भाषणादरम्यान, अक्षरश: हैराण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभं राहिल्यापासून पंतप्रधान मोदींना विरोधकांनी टार्गेट केलं. 

मणिपूरच्या खासदारांना बोलू द्यावं या मागणीवरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान, सलग तासभर घोषणाबाजी ही सुरूच ठेवली. 'मणिपूरला न्याय द्या', 'झूट बोले कौवा काटे..' यासारख्या घोषणांनी विरोधकांनी लोकसभा अक्षरश: दणाणून सोडली. 

मात्र, या सगळ्या गदारोळात देखील पंतप्रधान मोदींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी त्यांनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या तुफान गदारोळात पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही तिप्पट वेगाने काम करू, तिप्पट ऊर्जा वापरू आणि तिप्पट परिणाम देशवासियांना देऊ. पीएम मोदींनी 60 वर्षांनंतर सातत्याने सरकार येण्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांमध्येही निवडणुका झाल्या. या चार राज्यांमध्येही आम्हाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. महाप्रभू जगन्नाथजींची भूमी असलेल्या ओडिशाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आंध्र प्रदेशात साफ सफाई केली आहे. हे (विरोधक) सूक्ष्मदर्शकातूनही दिसत नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp