Vidhan Parishad Election : आमदार फुटणार? विधानसभेआधी पुन्हा राजकीय भूकंप?
Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. मतदान झाले तर आमदार फुटून राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधान परिषद निवडणूक २०२४

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान

महाविकास आघाडीने तीन उमेदवार उतरवले रिंगणात
Vidhan Parishad Election Maharashtra : विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक होत आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या संख्याबळानुसार उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडून दोन उमेदवारांची नावे आतापर्यंत समोर आली आहे. मात्र, तिसरा उमदेवार महाविकास आघाडी उतरवण्याच्या तयारीत असल्याचे समजते, त्यामुळे निवडणूक होईल. निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवल्यास मविआला मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे. यात महायुतीचे आमदार क्रॉस व्होटिंगचा धोका आहे. त्यामुळे कुणाची किती ताकद आहे आणि किती गरज आहे, हेच समजून घ्या. (Maharashtra Vidhan Parishad Election Votes quota)
MLC Election : कोणत्या आमदारांचा कार्यकाळ होतोय पूर्ण
महायुती आणि महाविकास आघाडीच्या खालील आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

विधानसभेतील संख्याबळ, निवडून येण्यासाठी किती मतांचा कोटा?
महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे. पण, काही आमदारांचे निधन झाले आहे. तर, काही खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत 274 आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांचा कोटाही कमी झाला आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 23 मते आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला ती मिळणार नाही, तो पराभूत होईल.

Maha Vikas Aghadi vs Mahayuti : कोणत्या पक्षाचे विधानसभेत किती आमदार?
विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या 288 असली, तरी सध्या 274 सदस्य आहेत. यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांचे किती आमदार आहेत पहा...