Vidhan Parishad Election : शिंदेंचे उमेदवार ठरले! 'हे' दोन नेते आमदार होणार

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे.
विधान परिषद निवडणुकासाठी शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक २०२४

point

एकनाथ शिंदेंनी लोकसभेला तिकीट न मिळालेल्या नेत्यांना संधी दिली

point

भावना गवळी आणि कृपाल तुमाने होणार आमदार

Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीत डावलल्या गेलेल्या दोन निष्ठावंत नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून येतील इतकी संख्या असून, शिवसेनेने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमदेवारी दिली आहे. (Bhavna Gavli and Krupal Tumhane are declared as the official candidate for the upcoming MLC polls from Eknath Shinde’s Shivsena)

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

लोकसभेला डावललं, विधान परिषदेला पुनर्वसन

लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवार बदलण्यास सांगितल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने रामटेक आणि यवतमाळ वाशिमसह इतर काही मतदारसंघात उमेदवार बदलले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा >> निकाल लागला! भाजपला दोन ठिकाणी झटका, ठाकरेंचा एक उमदेवार पराभूत 

रामटेक लोकसभा मतदारसंघात कृपाल तुमाने यांना बाजूला करून काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कृपाल तुमाने नाराज झाले होते. त्यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेऊन भाजपवर टीका केली होती. 

दुसरीकडे, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास भावना गवळी इच्छुक होत्या. उमदेवारी मिळवण्यासाठी त्यांनी शिंदेंच्या भेटी घेतल्या. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. पण, त्यांच्या ऐवजी हेमंत यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेने गमावल्या आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान

दोन्ही नेत्यांचे पुनर्वसन करण्याचे ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली होती. अखेर दोन्ही नेत्यांना विधान परिषदेत पाठवले जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

ADVERTISEMENT

भाजपने कुणाला दिली उमेदवारी?

1) पंकजा मुंडे
2) योगेश टिळेकर
3) परिणय फुके
4) अमित गोरखे
5) सदाभाऊ खोत

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT