Vidhan Parishad Maharashtra : निकाल लागला! भाजपला दोन ठिकाणी झटका, ठाकरेंचा एक उमदेवार पराभूत
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली. ठाकरेंनी मुंबईत गुलाल उधळला आहे, तर नाशिकमध्ये झटका बसला आहे. भाजपचे दोन उमदेवार पराभूत झाले असून, कोकण पदवीधरमधून डावखरेंनी गुलाल उधळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षण निवडणूक निकाल
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील दोन्ही जागा जिंकल्या
कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकची जागा महायुतीकडे
Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या चार जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. तीन मतदारसंघाचे निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले, तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळीपर्यंत चालली आणि निकाल जाहीर करण्यात आला. चारपैकी दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. (Uddhav Thackeray's Shiv Sena has won the Mumbai Graduate and Mumbai Teacher constituencies)
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षण अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली आणि निकाल जाहीर झाले आहेत.
मुंबईत पुन्हा ठाकरेंचे वर्चस्व
मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या दोन्ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. मुंबई पदवीधरमधून अनिल परब हे विजयी झाले.
हेही वाचा >> 'भ@ माझ्याकडे हात...', अंबादास दानवेंची भाजप आमदार प्रसाद लाडांना भर सभागृहात शिवीगाळ
मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ज.मो. अभ्यंकर हे विजयी झाले. या दोन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवार उतरवले होते. अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार हे निवडणूक लढवत होते. तर ज.मो. अभ्यंकर यांच्याविरोधात शिवनाथ दराडे यांन उमेदवारी दिली होती.










