Personal Finance: मुलांच्या नावावर Investment करताना पालक करतात ‘या’ चुका!

रोहित गोळे

मुलांच्या नावावर गुंतवणूक करताना पालकांकडून कोणत्या सामान्य चुका होतात आणि त्या टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे या बातमीत जाणून घ्या. मुलांच्या शिक्षणासह भविष्यातील आर्थिक गरजांसाठी Investment Planning, Tax, Risk आणि Documentation का महत्त्वाचे आहे, याची माहिती येथे दिली आहे.

ADVERTISEMENT

personal finance kids investment planning mistakes parents should avoid
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडून लहान वयापासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली जाते. शिक्षण, परदेशातील उच्च शिक्षण, लग्न किंवा भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन Mutual Funds, SIP, PPF, FD, Sukanya Samriddhi Yojana यांसारख्या पर्यायांचा विचार केला जातो. मात्र, केवळ मुलाच्या नावावर गुंतवणूक केली म्हणजे आर्थिक नियोजन पूर्ण झाले असे नाही. गुंतवणुकीची निवड, कालावधी, जोखीम आणि कागदपत्रांबाबत काही चुका झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

1. फक्त मुलाच्या नावावर Investment म्हणजे Planning असा गैरसमज

मुलाच्या नावावर खाते किंवा गुंतवणूक सुरू करणे ही सुरुवात आहे; पूर्ण आर्थिक नियोजन नाही. मुलाचे वय, भविष्यातील Goal, किती वर्षांनी पैसे लागणार आहेत आणि किती रक्कम आवश्यक आहे याचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे.

2. Goal ठरवून न घेता Investment सुरू करणे