PM Modi Speech : ‘मी पुन्हा येईन’, नरेंद्र मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ला भाषण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. 90 मिनिटांच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले.
ADVERTISEMENT
PM Modi Speech in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात एनडीए सरकारने केलेल्या कामांचा हिशोब दिला. पंतप्रधान मोदी यावेळी पुढच्या वर्षी पुन्हा येईनचा नारा देत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (PM Modi full speech on independence day 2023)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
1) “मागील काही आठवडे ईशान्य भारतात, विशेषतः मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतर भागात हिंसाचार उफाळून आला. अनेक लोकांना जीव गमवावे लागले. माता-भगिनींच्या अब्रूसोबत छेडछाड झाली. पण, काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित होत असल्याच्या बातम्या येत आहे. देश मणिपूरसोबत आहे. मणिपूरमधील लोकांनी मागील काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे, हे पुढे घेऊन जावं. शांतीतून समाधानाचा रस्ता निघणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.”
2) “भारताची निर्यात वेगाने वाढत आहे. जगभरातील तज्ज्ञ म्हणताहेत की भारत आता थांबणार नाही. जगातील रेटिंग एजन्सीज भारताचा गौरव करत आहे. कोरोना काळानंतर जग वेगळ्या पद्धतीने विचार करू लागलं आहे. जसं दुसऱ्या महायुद्धानंतर जगात नवीन ‘वर्ल्ड ऑर्डर’ स्वीकारली होती. तसंच कोरोनानंतर नवीन जागतिक भौगोलिक समीकरण तयार झाले आहे. त्याची व्याख्या बदलत आहे. बदलत्या विश्वाला आकार देण्यात भारत निर्णायक वळणार उभा आहे.”
हे वाचलं का?
वाचा >> अजित पवार माघारी फिरणार?, शरद पवारांची खळबळ उडवणारी ‘गुगली’
3) “भारतीयांनी 30 वर्षांच्या अनुभवानंतर 2014 मध्ये असं ठरवलं की, देशाला पुढे घेऊन जायचं असेल, तर स्थिर सरकार गरजेचं आहे. देशवासीयांनी मजबूत सरकार बनवलं. देशाजवळ आज सर्वजण सुखाय, सर्वजण हिताय सरकार आहे. देशाच्या संतुलित विकासासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक पैसा जनतेच्या भल्यासाठी लावत आहे. सरकारचं एकच धोरण आहे, ते म्हणजे राष्ट्र प्रथम.”
4) “2014 आणि 2019 देशाने मजबूत सरकार दिलं. देशाने फॉर्म केले म्हणून मोदीमध्ये रिफॉर्म करण्याची हिंमत आली. मोदींनी एकापाठोपाठ एक सुधारणा केल्या, तेव्हा प्रशासनातील लोकांनी हे पोहोचवण्याची जबाबदारी निभावली.”
5) “भ्रष्टाचाराचा राक्षसाने देशाला जखडून ठेवलं होतं. लाखो कोट्यवधींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला डळमळीत करत होते. आम्ही गळती रोखली. आम्ही अर्थव्यवस्था मजबूत केली. गरिबांच्या कल्याणासाठी पैसा खर्च करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतो, तेव्हा तिजोरी वाढत नाही, तर देशाचं सामर्थ्यही वाढतं. प्रत्येक पैसा जनतेच्या कल्याणासाठी खर्च करणारे सरकार असेल, तर परिणाम चांगले येतात.”
ADVERTISEMENT
वाचा >> ‘मला भाजपची ऑफर…’, राज ठाकरेंकडून गौप्यस्फोट; Inside Story
6) “तिरंग्याच्या साक्षीने लाल किल्ल्यावरून मी 10 वर्षांचा हिशोब देशाला देतोय. पूर्वी राज्यांना 30 लाख कोटी केंद्र सरकारकडून राज्यांना दिले जात होते. मागील 9 वर्षात हा आकडा 100 लाख कोटींवर पोहोचला आहे. पूर्वी स्थानिक विकासासाठी 70 लाख कोटी जायचे. आज 300 लाख कोटींहून जास्त जात आहे. गरिबांची घरे बांधण्यासाठी 90 हजार कोटी खर्च व्हायचे, आज 4 लाख कोटी खर्च होतोय. युरियाची बॅग स्वस्तात मिळावी म्हणून सरकार 10 लाख कोटी रुपये अनुदान देत आहे. मुद्रा योजनेतून 20 लाख कोटींपेक्षा जास्त स्वयंरोजगारासाठी दिले आहेत.”
7) “पुढील पाच वर्षात देश पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये असेल, ही मोदीची ग्यारंटी आहे. साडेतेरा कोटी गरिबीतून बाहेर आले आहे. गरिबांची खरेदी शक्ती वाढली की मध्यम वर्गात येतात. इंटरनेट डेटा खूप महागडा होता. भारतात सगळ्यात स्वस्त डेटा आहे.”
ADVERTISEMENT
वाचा >> लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी भारतीयांना काय दिला संदेश?
8) “मी जेव्हा 2014 मध्ये तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा मी बदल घडवेन असं वचन घेऊन आलो होतो. 140 कोटींनी लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात जे वचन दिले होते, ते विश्वासात बदलले. कारण कठोर परिश्रम केले. देशासाठी केले. राष्ट्र प्रथम या भावनेने केले.”
9) “2019 मध्ये कामाच्या आधारावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिले. येणारी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. 2027 मधील स्वप्न साकार करण्यासाठी सर्वात मोठा सुवर्ण काळ येणारी पाच वर्षे आहेत. पुढच्या वर्षी 15 ऑगस्टला याच लाल किल्ल्यावरून मी तुम्हाला देशाची प्रगती, यश आणि गौरव सांगेन.”
10) “मी तुमच्यापैकी एक आहे. मी तुमच्यासाठी जगतो. मला जे स्वप्न पडते, ते तुमच्यासाठीचं असतं. मी घामही गाळत असेल, तर तुमच्यासाठी. तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवलीये म्हणून नाही, तर तुम्ही माझं कुटुंब आहात. तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमचं दुःख बघू शकत नाही. तुमचा स्वप्नभंग झालेला बघू शकत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी जगण्याचा निर्धार करून मी चालतोय.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT