स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाच्या प्रगतीला गती देणार 'शक्तीची सप्तधारा'

मुंबई तक

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शक्तीची सप्तधारा’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली.

ADVERTISEMENT

Narendra Modi Independence Day Speech
Narendra Modi Independence Day Speech
Google CTA

बातम्या हायलाइट

point

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

point

देशाच्या प्रगतीला गती देणार 'शक्तीची सप्तधारा'

Narendra Modi Independence Day Speech : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शक्तीची सप्तधारा’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. देशाच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी उत्पादन क्षेत्र, शेती व अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गति-शक्ती, रक्षा शक्ती, हरित आणि निळी अर्थव्यवस्था (ग्रीन अँड ब्लू इकॉनॉमी) आणि भारताची सॉफ्ट पॉवर या सात प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

भारतीय उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवा

देशाला जागतिक उत्पादन हब बनवण्याचे आवाहन करत पंतप्रधान म्हणाले की, भारतीय उत्पादनांनी स्पर्धात्मक खर्च, उच्च दर्जा आणि मोठ्या प्रमाणातील उत्पादनावर (स्केल) भर दिला पाहिजे, जेणेकरून ती आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत ठरतील. यासोबतच, भारतीय शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. डिजिटल आणि दळणवळण तंत्रज्ञानामध्ये भारताने आघाडी कायम ठेवत नवनवीन संशोधनांवर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा : Independence Day LIVE: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन

ग्रीन अँड ब्लू इकॉनॉमी

देशाच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी 'गति-शक्ती'च्या माध्यमातून जलद आणि अखंड दळणवळण व्यवस्थेवर भर दिला. 'रक्षा शक्ती' अंतर्गत भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि सुपरसॉनिक तंत्रज्ञानासारख्या अत्याधुनिक आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानाचा वेगाने अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, हरित तंत्रज्ञान आणि सागरी साधनसंपत्तीचा (ग्रीन अँड ब्लू इकॉनॉमी) पुरेपूर वापर करून शाश्वत विकासाकडे पावले टाकण्यावर त्यांनी विशेष जोर दिला.

हे ही वाचा : Personal Finance: एकाच पगारात घर, EMI, SIP आणि Emergency Fund कसं करायचं मॅनेज?

सॉफ्ट पॉवर

भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि जागतिक प्रभावाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सॉफ्ट पॉवरच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. योग, आयुर्वेद, सर्वांगीण आरोग्य पद्धती (होलिस्टिक हेल्थ), देशातील सर्जनशील संसाधने आणि पर्यटन क्षेत्र भारताला जगभरात नवी ओळख मिळवून देत असल्याचे त्यांनी सांगितले. 'शक्तीची सप्तधारा' ही संकल्पना भारताला एक विकसित, समर्थ आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.