नांदेड: माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला, डेरा सच्चा राम रहीम धार्मिक कनेक्शन की...
नांदेडमधील गुरुद्वारात सुखबीर सिंह बादल यांच्यावर 62 वर्षीय निहंगाने कृपाणने हल्ला केला. या हल्ल्यानंतर गुरमीत राम रहीम आणि जुन्या धार्मिक वादांची चर्चा पुन्हा का सुरू झाली?
ADVERTISEMENT

नांदेड: शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथे गुरुवारी कृपाणने हल्ला करण्यात आला. नांदेडमधील गुरुद्वारा माता साहिब देवन जी मुकट परिसरात दुपारी सुमारे 1.45 वाजता हा प्रकार घडला. निहंग वेशात आलेल्या व्यक्तीने बादल यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
हल्लेखोर कोण?
या प्रकरणात पोलिसांनी 62 वर्षीय जसपाल सिंह याला ताब्यात घेतले आहे. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, काही काळ पुणे न्यायालयात वकील म्हणून काम करत होता. मागील दोन वर्षांपासून तो नांदेडजवळील मुगत येथील माता साहिब गुरुद्वारात सेवा करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी काय?
सुखबीर बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील कारणाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या घटनेनंतर त्यांच्या जुन्या राजकीय आणि धार्मिक वादांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेषतः डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याशी संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, राम रहीम प्रकरणाचा आणि नांदेडमधील हल्ल्याचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही.
हे ही वाचा>> 'निवडणूक आयोगाने "तो" निर्णय आधीच ठरवलेला', ठाकरेंच्या वकिलाचा कोर्टात मोठा आरोप
काय आहे राम रहीम प्रकरण?
2007 मध्ये गुरमीत राम रहीम यांनी पंजाबमधील सलाबतपुरा येथे एका कार्यक्रमात केलेल्या वेशभूषेवरून शीख समाजात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर श्री अकाल तख्त साहिबकडून राम रहीम यांच्याविरोधात आदेश जारी करण्यात आला.
