काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखवला कात्रजचा घाट, राहुल गांधींना घेऊन जाणारी बसच केली पंक्चर

मुंबई तक

जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

rahul gandhi detained jantar mantar protest congress workers puncture police bus
काँग्रेसचं आंदोलन
Google CTA

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरच्या दिशेने निघालेल्या INDIA ब्लॉकच्या विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या बसला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंक्चर केल्याने जंतर-मंतर परिसरात मोठा गोंधळ झाला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आवाहनानंतर INDIA ब्लॉकचे खासदार दिल्लीतील जनपथ येथील सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये एकत्र आले होते. त्यानंतर हे खासदार जंतर-मंतरच्या दिशेने निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण परिसरात BNS कलम 163 लागू करण्यात आले होते.

राहुल गांधींना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवलं

सायंकाळी 5.53 वाजता राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत बसमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना छत्रसाल स्टेडियमच्या दिशेने नेण्यात येत होते. मात्र, राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या बसला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंक्चर केल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा>> सलग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी उतरले रस्त्यावर, नवी रणनीती आखली अन्...

सायंकाळी 6.49 वाजता राहुल गांधींना दुसऱ्या बसमधून नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.