राहुल गांधींच्या शेजारी उभी राहून महाराष्ट्राच्या रिया अहीरची दिल्लीतून डरकाळी!

मुंबई तक

Riya Ahir on Student Protest: विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांचे कौतुक केलं. तर यावेळी महाराष्ट्रातील आंदोलनकर्ती रिया अहीरने स्वतःवर होत असलेल्या कथित छळ, धमक्या आणि एफआयआरबाबत गंभीर आरोप केले.

ADVERTISEMENT

rahul gandhi on student protest students did nothing wrong riya ahir speaks out on harassment threats and fir
रिया अहीर आणि राहुल गांधी
Google CTA

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांचे कौतुक केले. विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थी आंदोलनकर्त्यांशी मोकळेपणाने चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी, या तरुणांनी संविधान, शिक्षण व्यवस्था आणि भारताच्या भविष्यासाठी संघर्ष केल्याचे म्हटले.

पाहा आधी राहुल गांधी काय म्हणाले

राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांनी कोणावरही हिंसा केली नसल्याचा दावा केला. उलट त्यांचा सातत्याने छळ करण्यात आला, त्यांना धमक्या देण्यात आल्या, लाठीमार करण्यात आला आणि मारहाण करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी चर्चेदरम्यान सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी मांडलेल्या एका मुद्द्याचा विशेष उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, अन्याय कोणावरही झाला तरी नागरिक म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हीच संविधानिक आणि राष्ट्रवादी मूल्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा>> अभिजीत दीपकेंचा लाखो डॉलरचा शिक्षण खर्च चौकशीत सापडणार?

यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांचे उघडपणे कौतुक करत, "तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा किंवा ती स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे स्पष्टपणे म्हटले.