Raj Thackeray : ''महिलांना अशाप्रकारे पैसे देणं...'', 'लाडकी बहीण'वर राज ठाकरे काय बोलले?
Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी अशा योजना तयार करतायत, अशी टीका राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या
राज्यावर याचा परिणाम
समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही
Raj Thackeray on Ladki Bahin Yojana : धनंजय साबळे, अमरावती: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात खूप चर्चा आहे. या योजनेत सध्या महिलांच्या तिसरा हप्ता जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यात लाडकी बहीणवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. असे असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी अशा योजना तयार करतायत, अशी टीका राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे. (raj thackeray mns criticize mahayuti goverment on ladki bahin yojana scheme vidarbha tour maharashtra)
ADVERTISEMENT
राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान राज ठाकरेंनी पत्रकारांसाठी केलेल्या अनौपचारीक गप्पांपेळी लाडकी बहीणवर मोठं वक्तव्य केलं आहे. ''ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही”, अशा मुद्द्यांवर राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाष्य केलं होतं.
हे ही वाचा :Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला
दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेनंतर आता सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले? याबाबत मला काही माहिती नाही. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे, असं मी मानतो. आता राज ठाकरे कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहित नाही. पण तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून मी बोलत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांचं जर ते वाक्य असेल तर ते योग्य नाही, असं माझं स्पष्ट मतं आहे,असे प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा :Aditya Thackeray : ''मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधळलाय, तोच गुलाल...'',ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मोठं आव्हान
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असून आढावा घेत आहेत. त्यांनी काल पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. तर आज नागपूर, भंडारी, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT