Aditya Thackeray : ''मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधळलाय, तोच गुलाल...'',ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मोठं आव्हान
Aditya thackeray News : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेने भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविपचा सूपडा साफ केला आहे. या निवडणुकीतील दहा पैकी दहा जागा जिंकून ठाकरेंनी दस का दम दाखवला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सिनेट निवडणुकीत करून दाखवलं
विजय काय असतो हे काल आपण दाखवून दिलं
10 पैकी 10 निवडून आलो आता शांत बसणार नाही.
Aditya thackeray on Mumbai University Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेने (Yuva sena) भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविपचा (ABVP) सूपडा साफ केला आहे. या निवडणुकीतील दहा पैकी दहा जागा जिंकून ठाकरेंनी दस का दम दाखवला आहे. या निवडणुकीतील विजयानंतर ठाकरेंच्या युवा शिवसैनिकांनी मातोश्रीवर विजयाचा जल्लोष केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ''मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधळला आहात,तोच गुलाल विधानसभेच्या (Vidhan Sabha Election) निकालाच्या दिवशी उधळायचा आहे'', असे आवाहन त्यांनी केला आहे. (aditya thackeray celebration on matoshree of senate election result mumbai univsrsity udhhav thackeray)
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागा जिंकल्यानंतर युवा सेनेने मातोश्रीवर येऊन जल्लोष केला.युवासेनेच्या या विजयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सामील झाले होते. या जल्लोषानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सिनेटच्या निवडणुकीत आपण करून दाखवलं आहे आणि विजय काय असतो हे काल आपण दाखवून दिलं आहे. 10 पैकी 10 निवडून आलो आता शांत बसणार नाही. ही सूरूवात आहे असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत प्राप्त करायचा आहे, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त 'हे' काम लगेच करा
हे 40 गद्दार जेवढे आपल्यात होते तेव्हा जितकी नोंदणी झाली नव्हती ना, तितकी नोंदणी आता झाली आहे. मागच्या वर्षी ऐतिहासिक नोंदणी आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. 'आज मातोश्रीच्या आणि कलानगरच्या अंगणात जो गुलाल तुम्ही उधळला आहे. हाच गुलाल विधानसभेच्या निकालाच्या दिवशीही उधळायचा आहे. त्यासाठी तयारीला आजपासून लागा',असे मोठं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच ''हा जो विश्वास आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर तुम्ही दाखवला आहे. हाच विश्वास विधासभेत महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेवर दाखवाल, याची मला खात्री आहे, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी युवासेनेवर व्यक्त केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Devendra Fadnavis: 'धर्मवीर-3 ची पटकथा मी लिहीन', फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?
युवासेनेचे राखीव गटातील विजयी उमेदवार
मयुर पांचाळ - युवासेना - 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
शितल देवरुखकर शेठ - 5498 मते- SC प्रवर्ग
डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते - ST प्रवर्ग
स्नेहा गवळी- महिला
शशिकांत झोरे - NT प्रवर्ग
प्रदीप सावंत - खुला प्रवर्ग
मिलिंद साटम - खुला प्रवर्ग
अल्पेश भोईर - खुला प्रवर्ग
परमात्मा यादव - खुला प्रवर्ग
दरम्यान आज युवासेनेकडून मातोश्री बंगल्याबाहेर दुपारी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. सर्व विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर मातोश्रीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT