Devendra Fadnavis: 'धर्मवीर-3 ची पटकथा मी लिहीन', फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?
Devendra Fadnavis on Dharmaveer: 'धर्मवीर-3 सिनेमाची पटकथा मी लिहीन' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ज्याचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: धर्मवीर-2 हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ज्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सिनेमा प्रदर्शित होण्याआधी काल (26 सप्टेंबर) एका विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यासाठी राज्य सरकारमधील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, याच सिनेमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं ज्याबाबत आता राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे. (i will write the screenplay of dharmaveer 3 what is the exact meaning of devendra fadnavis statement)
धर्मवीर 2 स्क्रिनिंगनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'धर्मवीर 2 याची सगळ्यांना उत्सुकता होती. सगळे लोकं वाट पाहत होते. कधी आपल्याला दुसरा भाग पाहायला मिळतो अशी उत्कंठा देखील होती. एकप्रकारे आज ती उत्कंठा पूर्ण होते आहे. ज्या प्रकारे धर्मवीर 1 ला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अतिशय मनापासून लोकांनी सिनेमा पाहिला. तशाच प्रकारे धर्मवीर 2 हे प्रेक्षकांना आवडेल.'
हे ही वाचा>> Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?
'कारण सत्य कथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलंय. अनुभवलंय किंवा ऐकलंय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातील सिनेमा असल्यामुळे सगळ्यांना तो आवडेल.'
'प्रचंड रिसर्च करून छोट्यातील छोटं डिटेल त्या ठिकाणी आणलंय. मी धर्मवीर 2 ला दोनला शुभेच्छा देतो. सगळ्यांनी सिनेमा हॉलमध्ये सिनेमा येऊन पाहावा..' असं फडणवीस म्हणाले.










