Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?
Dharmaveer-2 Movie: धर्मवीर-2 हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय घडलं हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धर्मवीर-2 सिनेमा आजपासून महाराष्ट्रात प्रदर्शित

सिनेमात पाहायला मिळणार ठाकरे आणि शिंदेंमधील व्दंद्व

विधानसभा निवडणुकीआधी धर्मवीर 2 रिलीज
Dharmaveer-2 and Eknath Shinde: मुंबई: अभिनेता प्रसाद ओकची धर्मवीर आनंद दिघेंच्या वेशातील ती ग्रँड एंट्री, प्रसाद ओकना आनंद दिघेंच्या वेशात पाहून स्टेजवर असलेले एकनाथ शिंदे हे स्तब्ध झाले होते. प्रसाद ओक स्टेजवर येताच साक्षात आनंद दिघेच आले असं मानून एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकला वाकून नमस्कार केला होता. ही सर्व दृश्ये आपल्या डोळ्यासमोर येतात आणि हे आठवण्याचं कारण म्हणजे 13 मे 2022 रोजी 'गद्दारांना क्षमा नाही...' अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता. आता याच सिनेमाचा सिक्वेल 'धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. (complete story of dharmaveer 2 cinema what happened then between eknath shinde and uddhav thackeray)
नेमका हा सिनेमा आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच का रिलीज करण्यात येतोय. याचाच आढावा आपण आता घेणार आहोत.
धर्मवीर-2 सिनेमात नेमकं काय?
धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मे 2022 ला रिलीज झालेला. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. 2 वर्षापूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे हे तेव्हाच्या तत्कालीन ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.
हे ही वाचा>> Sanjay Raut : "मिंधे सेनेच्या लोकांना लेडीज बार...", आनंद आश्रमात पैसे उधळले, संजय राऊत संतापले
या सिनेमाचं भव्य ट्रेलर लाँचही उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. सलमान खान, रितेश देशमुखही यावेळी उपस्थित होते. शिंदेंसोबत बंड करून गेलेले डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते. 'गद्दारांना क्षमा नाही...' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमात आनंद दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता.