Dharmveer 2 Collection : 'धर्मवीर 2' ने सगळेच रेकॉर्ड मोडले, पहिल्या दिवशी जमवला 'इतक्या' कोटीचा गल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

dharmveer 2 box office callection day 1 record break collectin in opening anand dighe biopic prasad oak pravin tatde taran adarsh
धर्मवीर 2ची रेकॉर्डब्रेक कमाई,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'धर्मवीर 2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

point

देवरा सिनेमावर पडला भारी

point

पहिल्या दिवशी 'इतके' कोटी कमावले

Dharmaveer 2 Box office Collection Day 1 : आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा 'धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हा सिनेमा शुक्रवारी (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. या रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तब्बल 1.92 कोटीचा गल्ला 'धर्मवीर-2 सिनेमाने जमवला आहे. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे, असा दावा धर्मवीर 2 चे निर्माते मंगेश देसाई यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची आता चर्चा रंगली आहे. (dharmveer 2 box office callection day 1 record break collectin in opening anand dighe biopic prasad oak pravin tatde taran adarsh) 

धर्मवीर 2 सिनेमासोबत शुक्रवारी ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा देवरा सिनेमा देखील रिलीज झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांमध्ये थेट टक्कर झाली होती. त्यात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धर्मवीर देवरावर भारी पडला आहे. कारण धर्मवीर सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटीचा गल्ला जमवला आहे.  चित्रपट समीक्षक आणि फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. 

हे ही वाचा : Bigg Boss Marathi 5: अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात! 'कुचकेपणा...' म्हणत अंकिताला का सुनावलं?

तरण आदर्श यांनी एक्सवर लिहले आहे की, धर्मवीर सिनेमाने मराठी चित्रपटासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करण्याचा रेकॉर्ड केला आहे. धर्मवीरने शुक्रवारी 1.92 कोटीचा गल्ला जमवला आहे. हा आकडा आठवड्याच्या शेवटी वाढण्याचा अंदाजही तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'धर्मवीर 2'चे निर्माते मंगेश देसाई यांनी सिनेमाच्या कलेक्शनबाबत पोस्टमधून अपडेट दिली आहे. यानुसार, 'धर्मवीर 2' सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल 1.92 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2024 या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'धर्मवीर 2' मराठी सिनेमा ठरला आहे. "पहिल्याच दिवशी नेट 1.92 कोटी कमवून धर्मवीर -2 सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट !! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!!", असं मंगेश देसाई यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सिनेमात नेमकं काय? 

सिनेमाचा प्रिमीयर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला. निमंत्रितांपैकी काही जणांशी मुंबई Tak ने संवाद साधला असता धर्मवीर 2 मध्ये नेमकं काय होतं याच्या काही गोष्टी स्पष्ट झाल्या, जसे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर, महाराष्ट्रात घडलेलं पालघर साधू हत्याकांड, ट्रीपल तलाकचा निर्णय, कोरोना काळात आँक्सिजन सिलेंडर वरून घडलेला भ्रष्टाचार आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये, पक्षात व्यथित होते याचं चित्रण करण्यात आलं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Aditya Thackeray : ''मातोश्रीच्या अंगणात जो गुलाल उधळलाय, तोच गुलाल...'',ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मोठं आव्हान

'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री,आमदार, सामान्य शिवसैनिकांची होऊ न शकणारी भेट, व्यथित आमदार, मंत्री, शिवसैनिक या सर्व घटना एकनाथ शिंदेंना कथन करण्याचे प्रसंग यात मांडण्यात आले आहेत. पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना होणारा त्रास, व्यथा आणि त्यामुळेच त्यांनी बंड करत शिवसेना सोडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच धर्मवीर 2 ची कथा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर 2 महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT