एग्जिट पोल

Bigg Boss Marathi 5: अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात! 'कुचकेपणा...' म्हणत अंकिताला का सुनावलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठी सीझन 5 अंतिम टप्प्यात पोहोचला

point

अभिजीत बिचुकलेच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एन्ट्रीचा प्रोमो

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी' सीझन 5 सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच आता घरातील सदस्यांना आज चांगलाच धक्का मिळणार आहे. कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो पोस्ट करण्यात आलेला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकलेची घरात एन्ट्री झालेली दिसत आहे. यावेळी तो काही सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड थोडा खास असणार आहे. (abhijeet bichukle entry in the bigg boss marathi 5 house angrily said to ankita walawalkar showed her mistake)

सोशल मीडियावर अभिजीत बिचुकलेच्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एन्ट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत बिचुकले नमस्कार म्हणत एन्ट्री करतो. पुढे तो अंकिताने सूरजला नॉमीनेट केल्याबद्दल ‘बहीण असं कधीच करत नाही, तुमचा कुचकेपणा दिसला” अशा शब्दात तिचा पाणउतारा करताना दिसतोय. 

हेही वाचा : Gold Price: मोठ्या मोठ्यांची झाली दैना पण, सोन्याचा भाव काही खाली येईना! पाहा 1 तोळ्याच्या किंमती...

त्यानंतर  'मला इतका राग येत आहे की मी या घरातलं काहीही फोडू शकतो' असंही तो म्हणतो. एकूणच अभिजीत बिचुकलेंचा हा नवीन प्रोमो सर्वांचे  लक्ष वेधून घेत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अभिजीत बिचुकलेसोबतच राखीच्या एंट्रीचा प्रोमोही खूपच चर्चेत आहे. त्यामुळे अभिजीत आणि राखीच्या एन्ट्रीने आज घरात राडा, धिंगाणा आणि ड्रामा असं सर्वकाही पाहायला मिळणार आहे. 

अभिजीत बिचुकले याआधी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सदस्य म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी घरात तुफान राडा केला होता. मराठी बिग बॉसनंतर ते हिंदी बिग बॉसच्या सीझन 15 मध्ये दिसले होते. तिथेही त्यांनी फुल्ल राडा केला होता. 

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT