Ramdas Kadam : ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना 'त्यासाठी' ब्लॅकमेलं केलं'', मुंबई Tak चावडीवर रामदास कदमांचा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ramdas kadam big revealation on matoshree udhhav thackeray blackmail balasaheb thackeray shiv sena ubt eknath shinde shiv sena
रामदास कदम यांनी मुंबई तक चावडीवर हजेरी लावली होती.
social share
google news

Ramdas Kadam, Mumbai Tak Chavadi : नारायण राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांनी नाही केली. तर उद्धव उद्धव ठाकरेंनी करायला लावली. उद्धव ठाकरेंनी अक्षरशः बाळासाहेबांना ब्लॅकमेल केलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुंबई Tak चावडीवर केले आहे. रामदास कदमांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (ramdas kadam big revealation on matoshree udhhav thackeray blackmail balasaheb thackeray shiv sena ubt eknath shinde shiv sena)  

रामदास कदम यांनी मुंबई तक चावडीवर हजेरी लावली होती. यावेळी चावडीवर रामदास कदम यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. नारायण राणेंची पक्षातून हकालपट्टी करण्याठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अक्षरश: ब्लॅकमेल केलं. त्यांना (नारायण राणे) पक्षातून काढून टाका. नाहीतर मी घर सोडून जातो. नवरा-बायकोने बॅगा भरल्या आणि ते घराबाहेर पडले होते, फक्त मुख्यमंत्री व्हायचं होंत,म्हणून, मी त्याचा साक्षीदार आहे, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. त्यामुळे राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांनी केली नाही तर उद्धव ठाकरेंनी हक्कालपट्टी करायला लावली, असे रामदास कदमांनी सांगितले. 

हे ही वाचा : Manoj Jarange : ''फडणवीस साहेब तो डाव टाकू नका...'', जरांगे स्पष्टच बोलले

माझ्या मुलाला देखील राजकारणातून मुळासकट उपटायचा प्रयत्न झाला, असा आरोप रामदास कदम यांनी केला. मुलाला पुढे आणण्यासाठी जेव्हा तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांची जेव्हा तुम्ही हकालपट्टी करता. आम्हाला काय कळत नाही. प्रत्येक गोष्ट कळते, तुमच्यापेक्षा राजकारणात  जास्त पावसाळे आम्ही पाहिले आहेत. तुम्ही आज त्या गादीवर बसला आहात, आम्ही तुमचे नोकर आणि तुम्ही हिटलर, हुकूमशाह,असंच काम आम्ही जवळून पाहिलंय ना. सहन होत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं, अशी अवस्था असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनोहर जोशींना ज्याप्रकारे अपमानित करून बाहेर काढले त्या मेळाव्यालाही मी होतो. मनोहर जोशी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे तोंड केले हे मी पाहिले. समोर घोषणा चालू केल्या आणि जोशींना हाकलवून लावले, हे पाप नाही? सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक या सर्वांनी शिवसेना मोठी केली, असे सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हे ही वाचा : ओबीसी-मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे...: पंकजा मुंडे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT