OBC: 'माझा फोकस आता त्यांच्या सालस उपोषणाकडे', पंकजा मुंडेंकडून हाकेंचं कौतुक पण निशाणा जरांगेंवर?
obc reservation: लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाची विधानं केली आहेत. पाहा त्या नेमकं काय म्हणाल्या.
ADVERTISEMENT

pankaja munde vs manoj jarange: मुंबई: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत हाकेंचं कौतुक केलं तर मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे अनेक टोले लगावले आहेत. (obc reservation my focus on their hunger strike pankaja munde praises laxman hake but targets manoj jarange)
'लक्ष्मण हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाबाबत माझ्या मनामध्ये आदर असा आहे की, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं.. त्यांचे विचार मांडणं या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकारणं, बाह्या सारणं ही त्यांची भूमिकाच नाही..' असं म्हणत पंकजा मुंडेंनी एक प्रकारे मनोज जरांगेंवरच निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघात निसटता पराभव झाला. मराठा आणि ओबीसी असं मतविभाजन झाल्यामुळे हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. ज्यानंतर आता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा ओबीसी नेत्या म्हणून सक्रीय झाल्या आहेत.
पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या..
'लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे यांचे सहकारी यांनी उपोषणकर्त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असतील तर ते तपासले पाहिजे. चुकीचे असतील तर ते रद्द केले पाहिजेत. ही मागणी अत्यंत न्याय्य आहे.. त्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही.'