Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं

मुंबई तक

Sanjay Raut has made a controversial comment on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल (18 फेब्रुवारी) पुण्यातील एका भाषणात केली. ज्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut has made a controversial comment on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल (18 फेब्रुवारी) पुण्यातील एका भाषणात केली. ज्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर त्याच भाषेत टीका केली. पण याचवेळी टीका करताना संजय राऊतांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. (sanjay rauts tongue slipped while criticizing the chief minister eknath shinde and amit shah)

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे तळवे चाटले अशी टीका अमित शाहा यांनी केली. असं जेव्हा संजय राऊतांना पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं तेव्हा राऊत चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ते यावर तात्काळ म्हणाले की, ‘आता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री.. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का?.. काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती.’ असं वादग्रस्त वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं.

Amit Shah: मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी काँग्रेस-NCPचे तळवे चाटले: शाह

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘अमित शाह काय बोलतात हे महाराष्ट्राने कधीही गांभीर्याने घेतलेलं नाही. आता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री.. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का?.. काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं टोक आहे सध्याचं महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. इतकी टोकाची चाटूगिरी या महाराष्ट्रात चालली आहे. आणि ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला ज्ञान देतायेत.’

हे वाचलं का?

    follow whatsapp