आता पवारही उतरले मैदानात, अभिजीत दिपकेंना जाऊन भेटले.. पुढच्या क्षणी केलं 'ते' ट्विट!

मुंबई तक

Sharad Pawar on NEET Protest: दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. पाहा त्यानंतर शरद पवारांनी काय ट्विट केलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

नवी दिल्ली: NEET (National Eligibility-cum-Entrance Test) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांशी झालेल्या वागणुकीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन CJP (Citizens Justice Platform) चे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आणि पुढील भूमिका याबाबत सविस्तर माहिती घेतली. आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचीही त्यांनी विचारपूस केली.

'लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार'

शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नाही.

त्यांनी पुढे म्हटले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार दिला आहे. सरकार आणि प्रशासन हे जनतेसमोर उत्तरदायी असून, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करून योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?