NCP : क्या हुआ तेरा ‘दादा’? ‘तो’ व्हिडिओ शेअर केला अन् अजितदादांनाच घेरलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar ncp group sharing ajit pawar old video criticize devendra fadnavis maharahtra politics
sharad pawar ncp group sharing ajit pawar old video criticize devendra fadnavis maharahtra politics
social share
google news

Sharad Pawar NCP Group Criticize Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. या आरोप-प्रत्यारोपात आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने अजित पवारांना (Ajit Pawar) घेरण्यासाठी नवीन क्लुप्ती लढवली आहे. शरद पवार गटाने अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांचे जूने व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली आहे. या व्हिडिओत अजित पवार भाजपवर टीका करताना दिसतायत. त्यामुळे अजित पवारांची पुर्ती कोंडी झाली आहे. यावर आता अजित पवार गट काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (sharad pawar ncp group sharing ajit pawar old video criticize devendra fadnavis maharahtra politics)

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने पक्षाने अजित पवारांना घेरण्यासाठी नवीन व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत अजित पवार देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसले आहेत. माझ्याच बारामतीच्या परिसरात येऊन धनगर समाजाला त्यांनी (फडणवीसांनी) आश्वासन दिले. आमचं सरकार आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आता देवेंद्र फडणवीस कुठे गेले की त्या भागामध्ये गाणं लावले जाते, क्या हुआ तेरा वादा?, अशा शब्दात अजित पवार देंवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवताना दिसले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation: ‘सरकार इतकं नालायक असू शकतं का?’, मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे कडाडले

याच व्हिडिओचा संदर्भ घेत शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं आहे. फडणवीसांवर एकेकाळी हटकून टीका करणारे दादा, भाजपच्या फसवेगिरीचे वाभाडे काढणारे दादा, आज दादांनाच विचारायची पाळी आली आहे, हे काय करून घेतलंत दादा, अशा शब्दात टोला लगावला आहे. तसेच महाराष्ट्रातील जनता इमानदारांच्या आणि निष्ठावंतांच्या पाठीशीच कायम उभी राहिली आहे, हा इतिहास आहे, असे देखील शरद पवार गटाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अजित पवारांचे मोदींना हटवण्याचे आवाहन

मकर संक्रातीच्या शुभेच्छा देताना अजित पवारांनी मोदींना हटवा, असं आवाहन सभेला उपस्थित असलेल्या लोकांना केलं होतं. इतकंच नाही, त्याचबरोबर मला राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं नाहीये, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करतानाचा व्हिडीओ दाखवला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime : ‘कपडे काढले अन् उलटं टांगून…’, अनाथ आश्रमातील 21 मुलींसोबत सैतानी कृत्य!

हा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, “दादांची टीका म्हणजे लैच जहरी शब्द आणि आज हे ‘माजी टीकाकार’ मूग गिळून गप्प झालेत, तेही का आणि कशासाठी? दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय! पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडलाय! शब्द जपून वापरायचे असतात; आणि लक्षातही ठेवायचे असतात”, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT