NCP: ‘ज्यांच्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली, तेच आता..’, जयंत पाटलांनी चिमटाच काढला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena MLAs are upset with Ajit Pawar joining the power. At the same time, Jayant Patil has taken Shiv Sena MLAs to task along with Chief Minister Shinde.
Shiv Sena MLAs are upset with Ajit Pawar joining the power. At the same time, Jayant Patil has taken Shiv Sena MLAs to task along with Chief Minister Shinde.
social share
google news

मुंबई: ‘एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहे. राष्ट्रवादीमुळे ज्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली. तीच कारणे पुन्हा त्यांच्या पुढे आणून ठेवली जात आहे.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना हळूच चिमटा काढला आहे. कारण जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) अन्याय करायचे असे आरोप शिवसेना (ShivSena) आमदारांनी केले होते. असं असताना आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हेच शिंदेंच्या सरकारमध्ये आले आहेत. याच मुद्द्यावरुन जयंत पाटलांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (shiv sena mlas are upset with ajit Pawar joining shinde fadnavis govt jayant patil taunt marathi political status)

ADVERTISEMENT

‘काहींना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार होती. त्यांच्याच जिल्ह्यात ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे अशांचा असंतोष हळूहळू पुढे येईल.’ असं सूतोवाचही जयंत पाटलांनी यावेळी केले आहेत.

पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे तर अलीकडे महाराष्ट्रात नवीन झालेली नोशनल पार्टी आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय किंवा ठेवलय काय, मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मताला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही.’

हे वाचलं का?

‘सध्या केलेल्या कृतीचे समर्थन करणे त्यांना गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.’

‘एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहे. राष्ट्रवादीमुळे ज्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली. तीच कारणे पुन्हा त्यांच्या पुढे आणून ठेवली जात आहे. काहींना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार होती. त्यांच्याच जिल्ह्यात ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे अशांचा असंतोष हळूहळू पुढे येईल.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> NCP: शरद पवारांनी खडसावून सांगितलं तरी रुपाली चाकणकरांनी ऐकलंच नाही!

‘शरद पवार साहेब आमच्याच सोबत आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असला तरीही शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काल सातारा दौऱ्यात स्पष्ट केली आहे. थोड्याच दिसवात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पवार साहेब स्वत: दौरा सुरु करणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांसमोर मांडली. हा झंझावात नाशिक जिल्ह्यापासून सुरु होऊन महाराष्ट्रभर पवार साहेब फिरणार आहेत. हा दौरा लवकरच अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल. साताऱ्यात ज्याप्रमाणे साहेबांचे स्वागत झाले तशाच प्रकारे राज्यात साहेबांचे स्वागत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’

ADVERTISEMENT

‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नाशिक जिल्ह्यातील कार्यालयात आज पवार साहेबांना समर्थन देण्यासाठी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशीच परिस्थिती नागपूर येथे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन बैठक घेतल्यास त्यात कोणतीही अडचण नाही.’

हे ही वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला

‘कोणी काही म्हणाले तरी आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने मी प्रदेशाध्यक्ष झालेलो आहे. जोवर पवार साहेब या पदावरून बाजूला होण्याचा आदेश देत नाहीत तोवर मला बाजूला होण्याचा अधिकार नाही.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाची) उद्या मुंबईत बैठक, आमदार-खासदारांना हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या, दि.५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्यांनी बैठकीला उपस्थित राहावे. असे आदेश बजावण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT