Shiv Sena UBT: ‘त्या एका जिद्दीने मी उभा आहे…’, उद्धव ठाकरेंनी थेट मोदींनाच दिलं चॅलेंज!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shiv sena ubt chief uddhav thackeray challenge to pm modi and bjp in matoshree press conference
shiv sena ubt chief uddhav thackeray challenge to pm modi and bjp in matoshree press conference
social share
google news

Uddhav Thackeray Challange to PM Modi: मुंबई: ‘ज्या सत्तेची भीती वाटतेय ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही… ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या एका जिद्दीने मी उभा आहे..’ असं विधान करत शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हानच दिलं आहे. ‘मातोश्री’वर एका पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते. (shiv sena ubt chief uddhav thackeray challenge to pm modi and bjp in matoshree press conference)

ADVERTISEMENT

जळगाव आणि पाचोऱ्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गट आणि भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (UBT) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश पार पडला.

हे ही वाचा>> Maharashra Politics : शिंदे दक्ष आता लोकसभा निवडणुकीवर लक्ष! कधी, कुठे असणार दौरा?

याचवेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, ‘सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोगाचं नाही.. ज्या सत्तेची भीती वाटतेय ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही…’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंचं थेट चॅलेंज, पाहा नेमकं काय म्हणाले…

‘एक लक्षात घ्या सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोगाचं नाही.. ज्या सत्तेची भीती वाटतेय ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही… ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या एका जिद्दीने मी उभा आहे.. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे, माझं कोणी तरी आहे..’

हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : मुंबईतील तीन जागांवर डोळा, काँग्रेसच्या मनात काय?

‘ज्या सत्तेची भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे.. ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळे जणं सहभागी होत आहात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

‘नवं वर्ष लोकशाहीचं जावो…’, उद्धव ठाकरेंचा टोला

‘आता 1 तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल.. हे नवीन वर्ष आणि पुढची सगळी वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जावो..’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT