मविआची विधानपरिषदेची एकमेव जागा, सुप्रिया सुळेंची 'त्या' नेत्यासाठी फिल्डिंग, थेट फेसबुक पोस्ट
Supriya Sule : महाविकास आघाडीकडे विधानपरिषदेवर निवडून आणता येईल, अशी केवळ एकमेव जागा आहे. या जागेवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार असतील तरच आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलीेये. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मविआची विधानपरिषदेची एकमेव जागा
सुप्रिया सुळेंची 'त्या' नेत्यासाठी फिल्डिंग, थेट फेसबुक पोस्ट
Supriya Sule on Legislative Council Election : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विधानपरिषदेवर गेले. आता काही दिवसांत म्हणजेच 13 मे रोजी त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. खरं तर 2019 साली प्रथमच ठाकरे कुटुंबातील 2 व्यक्ती विधीमंडळात पोहोचल्या होत्या. त्यापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या रिमोट कंट्रोलची राज्यभर चर्चा असायची. मात्र, बाळासाहेब ठाकरे कधीही कोणत्या सभागृहाचे सदस्य झाले नाहीत. दरम्यान, विधानपरिषदेतून काही दिवसांत निवृत्त होत असलेल्या उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा त्याच सभागृहाचे सदस्य होण्याची संधी आहे.
हेही वाचा : ‘..तर भाजपला दोष देऊन काय उपयोग? याची गरज नव्हती’, श्रीनिवास पवार रोहित अन् जय पवारांबाबत काय म्हणाले?
महाविकास आघाडीकडे विधानपरिषदेवर निवडून आणता येईल, अशी एकमेव जागा आहे. काँग्रेसने या जागेसाठी उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तरच पाठिंबा दिला जाईल, अशी भूमिका घेतली होती. असं असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतून काही लोकं विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? ते विधानपरिषदेवर जाण्यासाठी खरंच इच्छुक आहेत का? यावर पुढील गणित ठरणार आहेत. दरम्यान, अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घेऊयात..
हेही वाचा : महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या, शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक









