‘मणिपूर हिंसाचार गृहमंत्रालयाचे अपयश’,ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

thackeray group criticize amit shah on manipur voilence
thackeray group criticize amit shah on manipur voilence
social share
google news

मैतई समाजाला आदिवासी समाजात घेण्याच्या निर्णयावरून मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार पेटलाय. या हिंसाचारावर आता ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकेचे तोफ डागलीय. मणिपुरातील भडका शमवण्यास गृह मंत्रालय अपयशी ठरल्याची टीका ठाकरेंनी अमित शाहांवर (Amit Shah) सामना अग्रलेखातून केली आहे.मणिपूरातील भडका (manipur voilence) शमविण्यासाठी राणा दांपत्यास इम्फाळला पाठवून तेथे अखंड हनुमान चालिसा वाचावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हिंसाचार करणाऱ्यांपुढे नमते न घेता ‘जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली’ असा गजर करण्याचेही म्हटले आहे. सामना अग्रलेखातून हा सल्ला देण्यात आला आहे. ठाकरेंचा हा सल्ला भाजप विचारात घेणार का? हे पाहावे लागणार आहे. (thackeray group criticize amit shah on manipur voilence and navneet rana ravi rana)

ADVERTISEMENT

ठाकरेंची अमित शहांवर टीका

देशाला गृहमंत्री आहेत,पण ते सदैव राजकीय विरोधकांच्या विरोधात कारवाया करण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे अतिरेकी,समाजकंटक, राष्ट्रदोही शक्तींना मोकळे रान मिळाले आहे.यामुळे मणिपुरातील भडका शमवण्यास गृह मंत्रालय अपयशी ठरल्याची टीका ठाकरेंनी अमित शाहांवर (Amit Shah) सामना अग्रलेखातून केली आहे. यासह मणिपुरातील भडका शमविण्यासाठी राणा दांपत्यास इम्फाळला पाठवून तेथे अखंड हनुमान चालिसा वाचावी व हिंसाचार करणाऱ्यांपुढे नमते न घेता ‘जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली’ असा गजर करावा,असाही सल्ला ठाकरेंनी भाजपला दिलाय.

हे ही वाचा : बंद दाराआड दोघांची मुंबईत भेट, सुप्रीम निकालाआधी धाकधूक

मणिपुर आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे अशांतता आणि अस्थिरतेचे भूत मणिपुरसह ईशान्य हिंदुस्थानाच्या बोकांडी पुन्हा बसणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी भापजचीच असल्याचे सामना अग्रलेखात म्हटलेय. तसेच मणिपूरमधील भडका वेळीच शमला नाही कर ईशान्य हिंदुस्थान परत एकदा अस्थिरता, अशांतता आणि फुटीरतेच्या कड्यावर उभा राहील.याची जाणीव जातीय आणि धार्मिक संघर्षावरच सत्ताकारण करणाऱ्या केंद्रातील मणिपुरमधील सत्ताधाऱ्यांना आहे काय? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

सीमावासीयांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आता ज्या अर्थी पंतप्रधान मोदी तिथल्या मतदारांना बजरंगबली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथला कर्नाटकव्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या माताभगिनींना सांगतोय की, तिथं कोणतंही सरकार आलं. कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय.”

“तुम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकजूट जपणाऱ्या मराठी उमेदवारालाच मतदान करा. जेणेकरून महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार निवडून येतील. मी सीमा भागातील, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतोय की, ज्याप्रमाणे मोदींनी सांगितलं जय बजरंगबली बोलून मतदान करा. तुम्ही जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा. पण मराठी माणसाची एकजूट तुटू देऊ नका. एकजुटीची वज्रमूठ दाखवून द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT