Sanjay Raut:फोटोला चिखल फासला, ‘सामना’ची होळी! CM शिंदेंच्या ठाण्यात काय घडलं?

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

thane bjp protest against sanjay raut samana editorial criticize devendra fadnavis
thane bjp protest against sanjay raut samana editorial criticize devendra fadnavis
social share
google news

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली होता. राऊतांच्या या टीकेनंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या फोटोला चिखल फासला, जोडे मारले आणि सामनाची होळी करून विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात खोपट भाजप मध्यवर्ती कार्यालयाबाहेर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (thane bjp protest against sanjay raut samana editorial criticize devendra fadnavis)

ADVERTISEMENT

भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्विकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय, अशी सडकून टीका खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामना च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांवर केली होती. फडणवीसांवरील या टीकेवर आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

हे ही वाचा : Raj Thackeray: ‘मोदींनी आरोप करताच 6 दिवसात अजित पवार..’, राज ठाकरे बरसले

ठाण्यात भाजपचं आंदोलन

संजय राऊतांच्या या टीकेवर ठाणे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. संजय राऊतांनी भाजप विरोधात वापरलेल्या भाषेचा निषेध करत, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. याचसोबत संजय राऊत यांच्या फोटोला चिखल फासला आहे, जोडे देखील मारले आहेत. इतकंच नाही तर भाजप कार्यकत्यांनी सामन्याचे वृत्तपत्र हाती घेऊन त्याची होळी करून निषेध नोंदवला आहे. ठाण्याच्या खोपट भाजप मध्यवर्ती कार्यालया बाहेर हे आंदोलन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत यांना वेड लागल्याने ते काही बडबडत राहतात त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात उद्या अर्ज देणार असून संजय राऊत जर असेच खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतील तर येत्या काळात त्यांना मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे ही वाचा : Nitin Gadkari: ‘गडकरींसोबत मी नक्कीच उभा राहीन’, रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांमुळे मोठी खळबळ

नागपूरात भाजप आक्रामक

दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरात देखील भाजप आक्रामक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सामना वृतपत्र जाळून त्याची होळी केली आहे. याचसोबत संजय राऊतांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखात काय लिहले आहे?

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱयाने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा! अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून करण्यात आली होती. ज्याला आता भाजपने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT