तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक; खाद्यतेल विक्रेत्यांना वर्षभराची मुदत
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या FDA कारवाईला महाराष्ट्र सरकारने एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या खाद्यतेल व्यापाऱ्यांना कायद्यानुसार बदल करण्यासाठी वेळ दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारचा ब्रेक
खाद्यतेल विक्रेत्यांना वर्षभराची मुदत
Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील खुल्या खाद्यतेलाच्या व्यापारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली होती. मात्र, आता राज्य सरकारने तूर्तास एक वर्षाची मुदत दिली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयात बदल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना एका वर्षाची सवलत जाहीर केली. या कालावधीनंतर मात्र कोणतीही अतिरिक्त सूट दिली जाणार नसून संबंधितांना कायद्याचे पालन करणे अनिवार्य असेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भेसळ होण्याची शक्यता असल्याने FDA ने खुले किंवा विनापॅकिंग खाद्यतेल असुरक्षित असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा : 'बघू वाटनाय राव, आधी कधीच एवढी अवस्था झाली नव्हती' इशारा देत बापू रडले
FDA च्या कारवाईला एक वर्षासाठी स्थगिती
गेल्या महिन्यात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना खुले किंवा पॅकिंग नसलेले खाद्यतेल खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. अशा तेलामध्ये भेसळीसारख्या प्रकारांची शक्यता असल्याने हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आदेश जारी करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर गुणवत्ता नियम आणि पारंपरिक तेल विक्रेते तसेच छोट्या ग्राहकांची उपजीविका यांच्यात समतोल साधण्याची भूमिका मांडली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने FDA च्या कारवाईला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : शौचालयाची खिडकी तोडली अन्... हत्या, लूट, चोरीच्या अल्पवयीन आरोपींमुळे नागपूरमध्ये खळबळ
