'बघू वाटनाय राव, आधी कधीच एवढी अवस्था झाली नव्हती' इशारा देत बापू रडले

मुंबई तक

shahajibapu patil emotional phone call about manoj jarange patil : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले शहाजीबापू पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाया पडले. जरांगे यांच्या प्रकृतीकडे पाहून भावुक झालेल्या शहाजीबापूंनी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

ADVERTISEMENT

shahajibapu patil emotional phone call
shahajibapu patil emotional phone call
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'बघू वाटनाय राव, आधी कधीच एवढी अवस्था झाली नव्हती' इशारा देत बापू रडले

point

शहाजीबापू पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? भेटीनंतर काय घडलं?

shahajibapu patil emotional phone call about manoj jarange patil  : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील अंतरवाली सराटीत पोहोचले.  पोहोचताच क्षणी शहाजीबापू पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या पाया पडले. त्यानंतर आंदोलनस्थळी घोषणा होताच वातावरण बदलले. जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती बिघडलेली असल्याचे पाहून शहाजीबापू पाटील भावुक झाले. त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची परिस्थिती अत्यंत बिकट आणि नाजूक असल्याचे सांगत सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचा : Personal Finance: मुलीच्या भविष्यासाठी SSY की PPF? जाणून घ्या कोणती योजना फायदेशीर

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर 

शहाजीबापू पाटील यांनी मराठा समाजाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय शेती असून जमिनीचे तुकडे होत चालल्याने पुढील पिढ्यांसमोर मोठे प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद केले. स्वतःच्या कुटुंबातील शेतीचे उदाहरण देत त्यांनी जमिनीचे विभाजन होत गेल्यानंतर शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याचे सांगितले. आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील मराठा समाजाचे लक्ष अंतरवाली सराटीकडे लागले असल्याचेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे पाहून परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : रात्री घराबाहेर पडली अन् अचानक गायब! बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खळबळ