Uddhav Thackeray : ‘कोंबडी चोर, डबल गद्दार’, ठाकरेंनी राणेंबरोबर कुणावर डागली तोफ?
मोदींचे मंदिरात साफसफाई करतानाचे फोटो आलेत ना, चकचकीत लादी आणि हे लादी पुसतात. तसाच झाडू घेऊन आता एक मतदार संघ साफ करायचा. सावंतवाडी तर करायची आहे. बाकी वैभव तर बसलेलाच आहे, विनायक राऊतांनी लोकसभेतही साफ केला आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
Udhhav Thackeray Criticize Narayan Rane : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सावंतवाडीतून बोलताना ठाकरेंनी (Udhhav Thackeray) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच ‘कोंबडी चोराची पीस तुम्हीच काढलीत’ असे विधान करत नारायण राणेंचे नाव न घेता त्यांना डिवचलं. त्यासोबतच ‘डब्बल गद्दार’ असा उल्लेख करत त्यांनी शिंदे गटातील नेत्यावर टीका केली. (Uddav thackeray criticize narayan rane deepak kesarkar sawantwadi tour ganpat gaikwad firing case maharashtra politics)
ADVERTISEMENT
इथला डबल गद्दार (दिपक केसरकर)… गद्दाराचा शिक्का कधी आयुष्यात पुसला जाणार नाही. दर आठवड्यांनी ते शिर्डीला जातात, पण कोणत्याचा पक्षावर त्यांची श्रद्धा नाही आणि पक्षात थांबण्याची सबुरी. यांच्या नसानसात गद्दीरी भरली आहे. त्यामुळे गद्दार हा गद्दार असतो तो कधी इमानदार होऊच शकत नाही,अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी नाव न घेता दिपक केसरकरांवर केली आहे.
हे ही वाचा : Baramati Lok Sahba : सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी फुंकले रणशिंग; केली मोठी घोषणा
ठाकरे यांनी यावेळी गोळीबाराच्या घटनेवर देखील भाष्य केले. पर्वा जो गोळीबार झाला. पण कोकणाला शिवसेनेने कसे वाचवले, तुम्ही कसे वाचला आहात. तेव्हा विनायक राऊत सारखी माणसे निवडून दिली नसती तर कोकणची काय अवस्था झाली असती. त्याचेवळी तुम्ही गुंडाना ठेचून टाकलत, त्यामुळे आता जी काय वळवळ एका मतदार संघात उरली आहे. तिचा देखील यावेळेला सुपडा साफ करायचा. कोकण पुर्ण साफ करायचा, असा निर्धारच ठाकरेंची जाहीर केला.
हे वाचलं का?
तसेच मोदींचे मंदिरात साफसफाई करतानाचे फोटो आलेत ना, चकचकीत लादी आणि हे लादी पुसतात. तसाच झाडू घेऊन आता एक मतदार संघ साफ करायचा. सावंतवाडी तर करायची आहे. बाकी वैभव तर बसलेलाच आहे, विनायक राऊतांनी लोकसभेतही साफ केला आहे, असे ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Manoj Jarange चा भुजबळांवर हल्लाबोल! ‘सरकारवर शंका घ्यायची, फडणवीस-अजित पवारांना…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT