Women Reservation Bill : ‘सरकारचं अपयश झाकण्यासाठी…’, ठाकरेंच्या खासदाराचा PM मोदींवर हल्लाबोल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray mp arvind sawant criticize pm narendra modi shivsena support women reservation bill special sesssion day 2
uddhav thackeray mp arvind sawant criticize pm narendra modi shivsena support women reservation bill special sesssion day 2
social share
google news

Women Reservation Bill Parliament Special Sesssion :  नव्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा सुरू आहे. या चर्चासत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारला महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि महिलांवरील अत्याचार अशा सर्व क्षेत्रात अपयश आले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी महिला आरक्षण विधेयक सरकारने आणल्याचा आरोप केला आहे. यासोबत अरविंद सावंत यांनी मणिपूर हिंसाचार आणि बलात्कार, महिला कुस्तीपटूंचे लैगिक शोषण या सर्व मुद्यावरून लक्ष केले आहे. (uddhav thackeray mp arvind sawant criticize pm narendra modi shivsena support women reservation bill special sesssion day 2)

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant)  यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. हा पाठिंबा दर्शवताना अरविंद सावंत म्हणाले की एकिकडे महिलांना आरक्षण मिळत असताना, दुसरीकडे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न देखील महत्वाचा मु्द्दा आहे. कारण मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढून बलात्काराची घटना घडली, देशाच्या कुस्तीपटूसोबत लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या. त्यामुळे एकिकडे आपण आरक्षण देतोय तर दुसरीकडे अत्याचार होतायत, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत. या घटनांवर डोळ्यातून पाणी देखील आले नाही, रागही आला नाही, कोणतीच प्रतिक्रिया देखील आली नाही, अशा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा : Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?

रोटेशनमध्ये ज्यावेळेस जी महिला 5 वर्ष चांगलं काम करून आली आहे. रोटेशननंतर पुढच्या वर्षी ती महिला काय करेल, तिकडेच बसून राहिल की ती लढणारच नाही. त्यामुळे आरक्षण 33 टक्क्यांच्या पुढे जाणार असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. रेल्वेच्या डब्यात जसे महिलांसाठी आरक्षित डब्बे असतात, यात पुरूषांना जाता येत नाही. पण पुरूषांच्या डब्ब्यात महिलांना जाता येते. तसेच पुढे देखील होणार असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी व महिलांवरील अत्याचार अशा सर्व प्रकरणात सरकारला अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी सरकारने हे बिल आणल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. तसेच हे बिल पुर्णत राजकिय आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे बील आणले गेल्याची टीका देखील अरविंद सावंत यांनी यावेळी केली.

हे ही वाचा : ‘प्रेमप्रकरणात शरीर संबंध ठेवणे बलात्कार नाही’, अलाहाबाद कोर्टाचा मोठा निर्णय

    follow whatsapp

    ADVERTISEMENT