Vasant More च्या संयमाचा बांध फुटला, मनसे सोडताना पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

vasant more leave mns raj thackeray pune lok sabha elction 2024 Sainath babar sharmila thackeray
आज मी मनसेच्या सदस्यत्वाचा, मनसेचा सरचिटणीस आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा संघटक म्हणून राजीनामा दिल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
social share
google news

Vasant More Left MNS, Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू आणि कट्टर मनसैनिक असल्येल्या वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसे सोडण्याच कारण सांगितलं आहे. दरम्यान मनसेची साथ सोडताना व पक्षात झालेल्या अन्यायावर बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.  (vasant more leave mns raj thackeray pune lok sabha elction 2024 Sainath babar sharmila thackeray) 

ADVERTISEMENT

वसंत मोरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, ''मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे. सुरूवातीच्या काळात राज ठाकरेंसोबत शिवसेनेत काम केले. पुण्याचा शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता मी होतो.  त्यानंतर राज ठाकरेसोबत मी पण शिवसेनेचा राजीनामा दिला.माझं करिअर राज ठाकरेंसोबत आहे. पण आज मी मनसेच्या सदस्यत्वाचा, मनसेचा सरचिटणीस आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा संघटक म्हणून राजीनामा दिल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.  

हे ही वाचा : भाजपने भाकरी फिरवली, पाच तासांत बदलला मुख्यमंत्री, कारण...

लोकसभा निवडणुकीवर काय म्हणाले? 

वसंत मोरे लोकसभा निवडणुकीवर बोलताना म्हणाले की, ''मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. पण मागच्या महिन्यात राज ठाकरेंनी लोकसभा मतदार संघाचे अहवाल मागवला होता. या अहवालात पुणे शहराची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचा अहवाल जाणुन बुझून राज ठाकरेंना दिला गेल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता. 

हे वाचलं का?

शेवटी आज सगळ्या गोष्टीचा कडेलोट झाला. ज्या शहरांमध्ये ज्या पदाधिकाऱ्यांसोबत मी राजकीय जीवनाची 15 वर्ष घालवली, तेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकिट मिळालं नाही  पाहिजे. पक्षाने निवडणूक लढवली नाही पाहिजे, असा निगेटीव्ह अहवाल देत असतील, तर अशा लोकांसोबत मी काम करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत,असे वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितले. 

हे ही वाचा : वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडायचं खरं कारण!

दरम्यान मी सगळ्या गोष्टी नेत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. पण नेत्यांना या गोष्टी का कळाल्या नाही. तुम्ही आता मला का फोन करताय? इतक्या दिवसांची माझी तडफड दिसली नाही का? असा सवाल देखील वसंत मोरेंनी उपस्थित केला. तसचे पुणे लोकसभा निवडणुकी बाबत बोलण्यासाठी मी राज ठाकरेंची वेळ मागितली होती. पण साहेब सुद्धा काय बोलले नाहीत.अशापद्धतीने राजकारण होत नसेल तर या लोकांमध्ये न राहिलेले बरं आहे,अशी भूमिका वसंत मोरेंनी घेतली. 

ADVERTISEMENT

माझा वाद राज ठाकरेंसोबत नव्हता, मनसेसोबतही नव्हता, परंतू ज्या चुकीच्या लोकांच्या हातात हे शहर दिले गेले, त्या लोकांनीच शहराच वाटोळ केलं,असा आरोप देखील वसंत मोरे यांनी केला.मी कोणत्याही परिस्थितीत मनसेत पुन्हा जाणार नाही. आणि कार्यकर्ते जे सांगतील त्याप्रमाणे आपली पुढची भूमिका ठरवेन,असे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT