Exclusive: 'राज ठाकरेंना दोन निरोप पाठवले पण...', वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडायचं खरं कारण!

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडण्याचं कारण (फाइल फोटो)
वसंत मोरेंनी सांगितलं मनसे सोडण्याचं कारण (फाइल फोटो)
social share
google news

Vasant More vs Raj Thackeray: पुणे: पुण्यातील मनसेचे अत्यंत धडाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज (12 मार्च) मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा दिला असल्याचं यावेळी जाहीर केलं. मात्र, त्यानंतर मुंबई Tak शी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना वसंत मोरेंनी मनसे सोडण्याचं खरं कारणही सांगितलं. (i sent a message to raj thackeray twice but he did not give an appointment vasant more told the real reason for leaving mns)

'मी या संदर्भात साहेबांकडे (राज ठाकरे) वेळ मागितली होती. मागच्या महिन्यापासून मला लोकसभेसंदर्भात बोलायचं आहे साहेब.. मला थोडी वेळ द्या. मी दोन वेळा साहेबांना निरोप पाठवली पण मला वेळ मिळाली नाही. त्यामुळे मी आज हा टोकाचा निर्णय घेतला.' असं म्हणत वसंत मोरे यांनी नेमकी काय खदखद होती ती मुंबई Tak सोबत बोलताना जाहीरपणे सांगितली.

मनसे सोडल्यावर वसंत मोरेंची मुंबई Tak सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत

'पक्ष संघटनेमध्ये वारंवार मला माझ्या एकनिष्ठतेबाबत पुरावे द्यावे लागत असतील, माझ्या शहरात... शहरामध्ये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक इच्छुक उमेदवार म्हणून मी पुढे येत असेल आणि माझ्याच शहरामधील लोकं एक निगेटिव्ह अॅप्रोच जर साहेबांपर्यंत नेत असतील.. की, मनसे म्हणून आपण लढायला तयार नाहीए. आपण लढू शकत नाहीए.. असं जर एक अहवाल देत असतील तर पक्ष हितासाठी हे हानिकारक आहे ना..' 

'मला आता पक्षाच्या लोकांचा जी पुण्यातील पक्षाची लोकं आहेत.. जी त्रास देत आहेत.. त्या लोकांच्या बाबतीत त्रास होतो. ती लोकं साहेबांपर्यंत निगेटिव्ह विषय पोहचवतात. मला जर वाटतं की, मी इच्छुक आहे.. गेल्या वर्ष दोन वर्षापासून मी सांगतोय की, मी लोकसभा लढायला तयार आहे तर पुण्यातील जे सहसंघटक म्हणून अमित साहेबांना जे मदत करतायेत त्यांनी साहेबांपर्यंत अहवाल देताना निगेटिव्ह अहवाल का दिला?' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'मी या संदर्भात साहेबांकडे वेळ मागितली होती. मागच्या महिन्यापासून मला लोकसभेसंदर्भात बोलायचं आहे साहेब.. मला थोडी वेळ द्या. मी दोन वेळा साहेबांना निरोप पाठवली पण मला वेळ मिळाली नाही. त्यामुळे मी आज हा टोकाचा निर्णय घेतला.'

हे ही वाचा>> युती तुटली! भाजपच्या खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

'साईनाथ बाबर यांच्याबाबतीत वहिनींनी अशी भूमिका मांडली नव्हती की, बाबरांना पुणे शहरातून उमेदवारी द्या, असा काही विषय नव्हता. बाबरांच्या अगोदरही वहिनींनी मला सांगितलं होतं की, पुणे शहरातील एक खासदार म्हणून झालं पाहिजे.' 

ADVERTISEMENT

'मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होतो, गटनेता होतो. 15 वर्ष सलग निवडून येणारा प्रतिनिधी आहे. मला वाटतं की, ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या पक्षाकडे देखील सातत्याने पाठविल्या आहेत. परंतु त्याबाबतीत मला कोणीच कधी समजून घेतलं नाही.'

ADVERTISEMENT

'माझ्याकडे आता कोणत्या ऑफर नाही.. मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी येत्या 2-4 दिवसांसोबत घेईल.'

'मी पवार साहेबांकडे ज्या विषयासाठी गेलो होतो तो विषय वेगळा होता. मी खरं तर सुप्रिया सुळेंकडे गेलो होतो. त्या ज्या भागातील लोकप्रतिनिधी आहेत.. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या.. तिथलं एक आरक्षण होतं. त्या आरक्षणाच्या बाबतीत मी तिथे गेलो होतो. मी कोणत्याही राजकीय विषयासाठी पवार साहेबांकडे गेलो नव्हतो.'

हे ही वाचा>> राज ठाकरेंना दंडवत घातला अन् वसंत मोरेंनी सोडली MNS

'मी दोन-तीन दिवसात लोकसभा अपक्ष लढायची की, कशी लढायची याबाबत निर्णय घेईल. पुणेकर ठरवतील माझी पुढची कशी वाटचाल असेल ते.' 

'मला सगळ्यांचे फोन आले.. पण मी कोणाचे फोन घेतले नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी निर्णय बदलणार नाही. मी अखेरचा अगदी दंडवत करून आलोय. त्यामुळे मी जय महाराष्ट्र करून आलोय..' असं वसंत मोरे यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT