देशातील 5 राज्यात सत्तेचा कौल कोणाला? ओपिनियन पोल नेमकं काय सांगतो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

what will happen in elections of these 5 states Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana, Mizoram country What opinion polls actually
what will happen in elections of these 5 states Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana, Mizoram country What opinion polls actually
social share
google news

Assembly Election 2023: देशातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असतानाच सी व्होटरचा ओपिनियन पोलमध्ये (C Voters Opinion Poll) अनेक धक्कादायक चित्र बघायला मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण काही दिवसामध्येच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे लोकसभेची (Loksabha election 2024) सेमिफायनल म्हणून बघायला मिळणार आहे. सी व्होटरचा ओपिनियन पोलमध्ये वेगवेगळी राजकीय गणितं पाहायला मिळणार असली तरी देशातील काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या दोन मुख्य पक्षांना याचा कसा फायदा होणार हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

निवडणुकींची गणितं बदलणार

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 3 राज्यात सत्ता मिळाली तर मात्र त्याचा फायदा लोकसभेला होईल की नाही हे चित्र त्याचवेळी कळणार आहे. कारण राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणुकांची गणितं आता बदलत गेली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> सेल्फीनं घेतला जीव! महाबळेश्वरमध्ये दरीत कोसळून पुण्याची महिला ठार

फायदा काँग्रेस की भाजपला

काँग्रेसला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही काँग्रेससाठी महत्वाची राज्यं आहेत. त्यामुळे सी व्होटर पोलने दाखवल्याप्रमाणे जर निकाल लागलेच तर त्याचा फायदा काँग्रेसला किती आणि भाजपला किती होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

पोल नेमकं काय सांगतो

सी व्होटर पोलने दाखवल्याप्रमाणे मध्यप्रदेशमध्ये भाजपला 103 -125 पर्यंत जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 113-125 पर्यंत जागा मिळू शकतात. तर इतर राजकीय पक्षांना 0-5 मिळण्याची शक्यता असून मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकते असंही भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर राजस्थानमध्ये एकूण 200 जागा आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 127-137 तर काँग्रेसला 59-69 जागा मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. तर छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा असून भाजप 35-55,तर काँग्रेसला 45-51 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये एकूण जागा या 119 आहेत. तर भाजप 10-12 आणि काँग्रेसला 48-60 आणि बीआरएस 43-55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मिझोरम 40 जागा आहेत. त्यामध्ये एमएनएफ 12-17 तर काँग्रेस 10-14, झेडपीएम 09-13 जागा मिळू शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी ही विधानसभा निवडणूक सेमिफायनल ठरणार असल्याचेच दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar यांचा मोठा निर्णय, बँक संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा

मुख्यमंत्री पदाचा चेहरा

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना, मिझोरम या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावरच देशाचे राजकीय भविष्य ठरणार का असं चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण पाच राज्यातील निवडणुका ठरल्या असल्या तरी पाचही राज्यातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे मात्र अजून ठरलेले नाही. त्यामुळे या निवडणुका पक्षाच्याच बळावर लढल्या जाणार की, राज्यातील नेतृत्वावर या निवडणुकांचा भविष्य ठरणार हेच दिसून येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT