Women Reservation Bill : महिला आरक्षण कायदा खरंच 2024 मध्ये लागू होईल का?
women’s reservation bill : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक आणले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास कधीपर्यंत कायदा होईल. पण, हा कायदा लागू होईपर्यंत अनेक अडथळे आहेत.
ADVERTISEMENT

Women Reservation Bill : गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विधेयकाची चर्चा होती, ते विधेयक अखेर संसदेमध्ये आलं आहे. महिलांचा सहभाग राजकारणात वाढावा यासाठी महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. हे विधेयक महिलांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. नव्या संसद भवनातून लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज सुरु झालं आहे. नव्या संसद भवनातून कामकाज सुरु होताच हे महत्त्वपूर्ण विधेयक मांडण्यात आलं आहे. नेमकं हे विधेयक काय आहे आणि ते येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये का लागू होऊ शकणार नाही, हेच आपण समजावून घेऊयात…
संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालंय आणि आता राज्यसभेत मांडलं जाईल. दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण आता लोकसभा आणि विभानसभेत देखील मिळणार आहे.
हेही वाचा >> गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?
याचाच अर्थ लोकसभा आणि विधानसभेतील 33 टक्के जागा या महिलांसाठी राखीव असतील. गेल्या 2 दशकांपासून हे विधेयक प्रलंबित आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले होतं, परंतु लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून महिला आरक्षणाच्या विधेयकाचे श्रेय घेतले जात आहे.
Nari shakti vandan bill : महिला आरक्षण विधेयकात काय आहे?
सध्या लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु आहे. चर्चेअंती दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक समंत झाल्यास महिलांना 33 टक्के आरक्षण मिळू शकणार आहे. आता या विधेयकामध्ये काय आहे ते समजून घ्या…