समजून घ्या: ठाकरेंचे माजी पार्टनर.. शिंदेंचे शिलेदार, अजय आशर आहेत तरी कोण?

मुंबई तक

Ajay Ashar: मुंबई: भारतात ज्या प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर निती आयोग आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. (Maharashtra institution of transformation) (मित्र) हे एक नियमक मंडळ राज्य शासनाकडून तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये राज्य शासनाने नियमक मंडळ देखील स्थापन केलं आहे. ज्याच्या उपाध्यक्ष पदी अजय आशर यांची नेमणूक करण्यात आली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Ajay Ashar: मुंबई: भारतात ज्या प्रमाणे राष्ट्रीय पातळीवर निती आयोग आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. (Maharashtra institution of transformation) (मित्र) हे एक नियमक मंडळ राज्य शासनाकडून तयार करण्यात आलं आहे. ज्यामध्ये राज्य शासनाने नियमक मंडळ देखील स्थापन केलं आहे. ज्याच्या उपाध्यक्ष पदी अजय आशर यांची नेमणूक करण्यात आली आहे. जे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. हे अजय आशर नेमके आहेत तरी कोण… आणि याच अजय आशर यांच्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कसा निशाणा साधलाय हे जाणून घेऊयात सविस्तर. (who is ajay asher who has been appointed to governing body of maharashtra institution of transformation)

सगळ्यात आधी जाणून घ्या अजय आशर आहेत तरी कोण..

अजय आशर हे रियल इस्टेटमधील आशर ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या या ग्रुपचे मुंबई-ठाण्यात अनेक मोठे प्रोजेक्ट सध्या सुरु आहेत. ज्यांची नियुक्ती MITRA चे उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

अजय आशर यांच्यावरुन सोमय्यांनी आदित्य ठाकरेंवर काय आरोप केलेले?

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर काही आरोप केले होते. उद्धव ठाकरेंवर त्यांनी आरोप केलेच होते. सोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केल्याचा आरोप केला होता.

सोमय्यांचा असा आरोप होता की, आदित्य ठाकरे हे मंत्रिपदावर असताना देखील काही कंपन्यांमध्ये अजय आशर यांच्यासोबत भागीदार होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp