अबू आझमींचं निलंबन नेमकं झालं कशामुळे? तुम्हाला माहितीए त्याची नेमकी Story?
औरंगजेबाचं कौतूक करणं हे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना प्रचंड महागात पडलं आहे. कारण त्यांचं संपूर्ण अधिवेशानासाठी विधानसभेतून निलंबन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आमदार अबू आझमींचं का झालं निलंबन?

अबू आझमींच्या विधानाचा सर्वपक्षीय आमदारांचा विरोध

संपूर्ण अधिवेशनासाठी आझमींचं करण्यात आलं निलंबन
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एका वक्तव्याने खळबळ माजवली आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं. पण नेमकं असं काय घडलं की आझमी यांना ही नामुष्की सहन करावी लागली?
अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य
सोमवारी (3 मार्च) अबू आझमी यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुघल सम्राट औरंगजेबाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांनी म्हटलेलं की, "औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, तर एक उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारत सोन्याची खाण होती आणि त्याने देशात अनेक मंदिरंही बांधली होती.'
हे ही वाचा>> Abu Azmi Suspended : औरंगजेबाचं कौतुक, आयशा टाकियाचे सासरे निलंबित, कोण आहेत अबू आझमी?
इतकंच नाही तर अबू आझमी यांनी बनारसची एक कथाही सांगितली, "जेव्हा एका पंडिताच्या मुलीशी त्याच्या सरदाराने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा औरंगजेबाने त्याला दोन हत्तींमध्ये बांधून मारलं होतं. नंतर त्या पंडितांनी औरंगजेबासाठी मशीद बांधून भेट दिली होती."
आझमी यांनी असंही दावा केला की, "औरंगजेबाच्या काळात भारताची जीडीपी 24% होता आणि त्याच्याविरुद्ध चुकीचा इतिहास सांगितला जातो."