Supriya Sule: पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Supriya Sules Saree Caught Fire: पुणे: पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने अचानक पेट (saree caught fire) घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रंसगावधान राखत सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली ही आग तात्काळ विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रतिमेचं पूजन करत असताना ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (supriya sules saree caught fire at an event in pune)

सुप्रिया सुळे या आज (15 जानेवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यासाठी सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम हा बावधन या ठिकाणी होता.

शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा केला की ते सत्तेत येतात- सुप्रिया सुळे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कराटे प्रशिक्षण शिबीर उद्घाटनाचा हा कार्यक्रम सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होता याच कार्यक्रमात दीपप्रज्वलन पार पडत असताना तिथल्या दिव्याच्या वातीमुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानाक पेट घेतला. पण ही बाब सुप्रिया सुळे आणि मंचावरील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने आग लगेचच विझविण्यात आली.

सुदैवाने यात सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरुप असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मात्र या घटनेमुळे वातावरणात काहिसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, सुप्रिया सुळे सुखरुप असल्याचं समजल्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली.

जी काही घटना घडली ती त्या ठिकाणी दिव्याच्या वातीमुळे घडली आहे. काही क्षण ही गोष्ट सुप्रिया सुळेंच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे आगीचा भडका हा वाढला. मात्र, जवळच असलेले कार्यकर्ते धावून आल्यामुळे आग अधिक प्रमाणात भडकली नाही. या सगळ्यानंतर सुप्रिया सुळे या सुखरूप असून त्या त्यांच्या नियोजत कार्यक्रमांसाठी रवाना झाल्या आहेत.

बाळासाहेबांचं नाव चालतं मग मुलगा आणि नातू का चालत नाही? सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

दरम्यान, या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांना अनेक जण विचारणा करत असल्याने त्यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पाहा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या:

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद

सुप्रिया सुळे, खासदार (राष्ट्रवादी काँग्रेस)

सुप्रिया सुळे यांचे पुण्यात ज्या-ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्या-त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी ही गर्दी आहे.कारण सुप्रिया सुळेंच्या लोकसभा मतदारसंघात हे कार्यक्रम असल्यामुळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या समस्या या घेऊन येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गर्दीमुळे देखील अशी घटना घडली असेल असं बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT