Uday Samant यांचा दावा “टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. अशात नागपुरात येणारा टाटांचा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशात हा प्रकल्प आज नाही तर वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

काय म्हटलं आहे उदय सामंत यांनी?

आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप मी समजू शकतो. विरोधक म्हणून ते आरोप आम्हाला अपेक्षितही आहेत. मात्र यामुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करू नये ही माझी विनंती आहे.मी एका मुलाखतीत हा उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. मात्र माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की २१ सप्टेंबर २०२१ ला म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचा MOU झाला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालं होतं असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

युवा पिढीचं दुर्दैव आहे

युवा पिढीचं दुर्दैव आहे की एक वर्षापूर्वीच महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला गेला त्याचा MOU झाला. महाराष्ट्रात हा प्रकल्प येणार नाही हे वर्षभरापूर्वीच निश्चित झालं होतं. मात्र हा प्रकल्प गुजरातहून महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक पत्रही केंद्र सरकारला पाठवलेलं नाही. खरोखर ही गोष्ट दुर्दैवी आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे टाटा एअरबस प्रकल्प?

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने ८ सप्टेंबर २०२१ रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून ५६ सी-२९५ एमडब्लू विमान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. २४ सप्टेंबर २०२१ रोजी याबाबतचा करारही करण्यात आला. या कराराअंतर्गत, १६ विमाने तयार अवस्थेमध्ये तर ४० विमानं भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), नेतृत्वाखाली भारतात तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च २१,९३५ कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो, असं संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT