Satyajeet Tambe : ‘ते’ दोन नेते, गुवाहाटी कनेक्शन अन् तांबेंची गुगली

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Two BJP leaders Guwahati connection and Satyajeet Tambe’s twist: मुंबई: महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकलं आहे. पक्ष वेगवेगळे, नेते वेगवेगळे असले तरी दोन्हीमध्ये एक समान धागा आहे. शिंदेंच्या बंडात आणि तांबे पिता-पुत्रांनी पुकारलेल्या काँग्रेसविरोधातल्या बंडात एकच कनेक्शन आहे. ते कनेक्शन आहे गुवाहाटी (Guwahati). हे गुवाहाटी कनेक्शन काय, ते दोन नेते कोण आणि त्या दहा मिनिटांत काय घडलं हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (two bjp leaders entry in last 10 minutes shinde groups guwahati connection and satyajeet tambes twist)

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) पाच जागांसाठी 12 जानेवारी हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. अर्ज भरायला काही तास, मिनिटं शिल्लक असताना काँग्रेसनं (Congress) दिल्लीतून सुधीर तांबेंची उमेदवारी जाहीर केली. अर्ज भरायला अवघा एक तास शिल्लक असताना दुपारी दोनच्या ठोक्याला तांबे पिता-पुत्र दोघेही नाशिकच्या विभागीय कार्यालयात पोचले. अर्ज भरायची वेळ संपत आली, तरी तांबे पिता-पुत्र पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर काही जात नव्हते.

विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे बाहेर भाजपकडून (BJP) इच्छूक असलेले उमेदवारही पक्षाचा एबी फॉर्म मिळेल म्हणून कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. अखेर अर्ज भरायला शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना दोघांची इथे एंट्री झाली. त्यांच्याकडे भाजपचा एबी फॉर्म होता. ही दोन्ही नेतेमंडळी भाजपच्या संघटनेत अत्यंत महत्त्वाच्या, अधिकाराच्या पदावर आहेत.

सुधीर तांबेंनी काँग्रेसकडून अर्ज भरला, तर भाजपच्या एबी फॉर्मवर सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) रिंगणात उतरवण्यासाठी ही नेते मंडळी इथे दाखल झाली होती. असं खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे. पण घरातच कुरबुरी नको म्हणून तांबेंनी मध्यममार्ग काढला. काँग्रेसनं पाठवलेल्या एबी फॉर्मला केराची टोपली दाखवत उमेदवारी नाकारली आणि मुलाला भाजपऐवजी अपक्ष म्हणून रिंगणात उतरवलं. दुसरीकडे भाजपनेही उमेदवार दिला नाही. आता भाजपच तांबेंना अधिकृत पाठिंबा देईल, असं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणूक 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

ADVERTISEMENT

आता आपण गुवाहाटी कनेक्शनबद्दल जाणून घेऊयात:

शिंदेंच्या बंडात आपल्याला भाजपची नेतेमंडळीही सूरत, गुवाहाटी, गोव्यात दिसली. शिंदेंनी आपल्यामागे महाशक्ती असल्याचंही गुवाहाटीत सांगितलं. पण ही महाशक्ती कोण याचा मात्र खुलासा केला नाही. पण सहा महिन्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात बंड झाल्याने या महाशक्तीची नव्यानं चर्चा होते आहे.

गुवाहाटीमध्ये शिंदेंचं बंड फत्ते होतंय की नाही, काही गडबड होते की नाही या सगळ्यांवर या नेत्याचं बारीक लक्ष होतं. आणि हाच नेता तांबेंच्या बंडावेळीही काही दगाफटका होऊ नये आणि झालाच तर ऐनवेळची स्ट्रॅटेजी राबवण्यासाठी शेवटच्या दहा मिनिटांत तिथे आला होता.

तांबे पिता-पुत्रांनीही अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसला साधा पत्ताही लागू दिला. याच सगळ्या घडामोडीत तांबेंचं बंडाचं मिशन फत्ते झालं. आता हेच गुवाहाटी कनेक्शन महाराष्ट्रात आणखी किती भूकंप घडवून आणतं हे बघायला हवं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT