रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला कोयनेतून पाणी पुरवणार : उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा
मुंबई : राजापूरमधील प्रस्तावित बारसू-सोलगाव येथील रिफायनरीला सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीतील रिफायनरीबाबत घेण्यात आलेल्या इतरही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये रिफायनरीसाठी सुरु असलेल्या भुसंपादनची आणि रिफायनरी कशा पद्धतीने होणार आहे […]
ADVERTISEMENT

मुंबई : राजापूरमधील प्रस्तावित बारसू-सोलगाव येथील रिफायनरीला सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीतील रिफायनरीबाबत घेण्यात आलेल्या इतरही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये रिफायनरीसाठी सुरु असलेल्या भुसंपादनची आणि रिफायनरी कशा पद्धतीने होणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत आणि सर्व अधिकाऱ्यांची उदय सामंत यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र विनायक राऊत या बैठकीला अनुपस्थित होते. या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितलं असल्याचं सामंत म्हणाले. याशिवाय पुढच्या टप्प्यात विरोधातील आणि समर्थन करत असलेल्या शेतकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.
बारसू-सोलगाव रिफायनरीला कोयना धरणातून पाणी पुरवणार :
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, या बैठकीत आमदार राजन साळवी यांनी अर्जूना आणि जामदा डॅममधून पाणी उपसा केल्यास स्थानिक पातळीवर पाणी टंचाई होऊ शकते, असं मत मांडलं. आमचा देखील तोच सर्वे आहे. त्यामुळे आता कोयना धरणातून पाणी पुरवठा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.