Kirit Somaiya: उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी, कारण लवकरच…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी पुण्यातल्या मानाचा कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आरतीही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यावरचं अमंगळ सरकार गेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचं जीवन मंगलमय करणार आहेत असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

भ्रष्टाचाराचं स्मारक तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातात हातोडा दिला : किरीट सोमय्या

नेमकं काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या?

उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारला जनतेने कायमचं रवाना केलं आहे. त्यांचा उजवा हात तर जेलमध्ये गेला आहे असं म्हणत त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली. तसंच तुमचा डावा हातही आता तुरुंगात जाणार आहे. तुम्ही आता तुमच्या मुलाची म्हणजेच आदित्य ठाकरेंची काळजी घ्या असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांनी एक प्रकारे हा खोचक सल्लाच दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ED: किरीट सोमय्या अगदी ठामपणे म्हणाले.., ‘अनिल परबला अटक होणारच!’

किरीट सोमय्या आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरेंविषयी?

आज दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास महापालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम भाई यांच्या आशिर्वादने मढ स्टुडिओचा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी केली आहे. त्याच पर्यावरण विभागाने हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे. हे सिद्ध होणार आहे.त्यामुळे ठाकरेंनी स्वतः च्या मुलाची काळजी घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी दिला. त्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले म्हणाले की,मागील वर्षी गणरायाला निरोप देताना.मी जेलमध्ये जात होतो आणि आज संबध महाराष्ट्र जेलमधून बाहेर आलेला आहे. त्या करीता मी आज पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपतीच्या दर्शनाला आलो आहे.

ADVERTISEMENT

गणराया हा विघ्नहर्ता,विद्येची, शक्तीची देवता आहे. तसेच मागील अडीच तीन वर्षात महाराष्ट्र राज्य माग गेला आहे.या राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ति दे हीच माझी गणरायाकडे प्रार्थना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे सरकारचं जे स्मारक आहे. महाराष्ट्राच कलंक ट्विन रिसॉर्ट ते पडण्याच्या कामाला गती देण्यासाठी उद्या मी दापोली येथे जाणार आहे. तसेच गणराया समोर एकच सांगतो.दापोली येथील रिसॉर्ट दिवाळी अगोदर जमीनदोस्त झालेल असणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT