Uddhav Thackeray: 'विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते', ठाकरेंचं मोठं विधान - Mumbai Tak - uddhav thackerays big statement mid term elections of vidhana sabha may be held - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Uddhav Thackeray: ‘विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते’, ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray statement on Vidhansabha mid-term elections: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (23 फेब्रुवारी) फेसबुक लाइव्हच्या (Facebook Live) माध्यमातून कसबा आणि चिंचवड या दोन पोटनविडणुकांचा प्रचार केला. याचवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर (BJP) प्रचंड तोंडसुख घेतलं. तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या (Maharashtra Vidhansabha) मध्यावधी निवडणुका (Mid-term Election) लागू शकतात असं मोठं […]

Uddhav Thackeray statement on Vidhansabha mid-term elections: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (23 फेब्रुवारी) फेसबुक लाइव्हच्या (Facebook Live) माध्यमातून कसबा आणि चिंचवड या दोन पोटनविडणुकांचा प्रचार केला. याचवेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर (BJP) प्रचंड तोंडसुख घेतलं. तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या (Maharashtra Vidhansabha) मध्यावधी निवडणुका (Mid-term Election) लागू शकतात असं मोठं विधान केलं आहे. (uddhav thackerays big statement mid term elections of vidhana sabha may be held)

‘माझा अंदाज आहे की, विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते. कारण अपात्रतेचा जो काही एक विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ते जर का उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

By Poll: ‘शिवसैनिकांनो काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मतदान करा’, ठाकरेंचा थेट आदेश

पाहा उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणुकांबाबत काय म्हणाले:

‘सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण त्यांना देऊन टाकला आहे. म्हणजे हा कहर झाला. मी आज पुन्हा मिंध्यांना आव्हान देतोय.. तुम्ही आमचा चोरलेला धनुष्यबाण तो घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो. पण ही निवडणूक नंतर होईल. पण आज मात्र कसब्यामध्ये काँग्रेसमध्ये आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना विजयी करावंच लागेल.’

‘माझा अंदाज आहे की, विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते. कारण अपात्रतेचा जो काही एक विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ते जर का उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात.’

‘आपल्या देशाला हुकूमशाहीकडे जाण्यापासून रोखायचं असेल तर पहिल्या प्रथम चिंचवडला नाना काटे आणि कसब्याला धंगेकर यांना विजयी करावंच लागेल. तुम्ही सगळे सुजाण आहात म्हणून ही लोकशाही जपण्याचं काम हे मी तुमच्यावर सोपवतोय. पुन्हा एकदा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला विजयी करा असं आवाहन करतो.’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं आहे.

‘नव्याने पक्ष बांधा अन्…’; गुलाबराव पाटलांचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज

उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करण्याचं शिवसैनिकांना आदेश

दरम्यान, आपल्या याच लाइव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचे थेट आदेश दिले आहेत.

‘मला काही जण म्हणतात की, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत अपप्रचार केला गेला होता. की, शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करणार का?.. हो करणार… 25-30 वर्ष भाजपला नव्हतं केलं?’

‘मग ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्याशी तेव्हा वागले होते त्यापेक्षाही भयानक, निर्घृण पद्धतीने आज भाजप आमच्याशी वागत असेल तर मी तमाम शिवसैनिक आणि नागरिकांना सांगतोय की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणत्याही परिस्थितीत जे शिवसेनेला मुळासकट उखडायला निघालेत अशा भाजपला मदत होता कामा नये. ती जर मदत केली गेली तर आपण शिवसेनेचं नाव लावायचं नाही.’

‘आमच्याबद्दल तुमच्या मनात सहानुभूती नसेल तर तुमच्याबद्दलही आमच्या मनात सहानुभूती नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.

स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म… Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास! तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण… परिणीती, कियारा, आलिया… लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक! राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं? Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo भारतातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे! कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन… जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो? सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर… डोक्यावर फेटा, काळा चष्मा… राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक! 6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला ‘तो’ विक्रम! Premanand Maharaj : ‘या’ 2 गोष्टी करा… विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस! Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही? Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो? Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं? Alibaug मधील ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर! तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचे स्पीड कमी झाले असेल तर हे पर्याय निवडा घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी…