EVM News : ईव्हीएम खरंच हॅक केलं जाऊ शकतं का? तज्ज्ञांचं उत्तर काय?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

EVM : भारतात ईव्हीएम मशीनबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, हाही एक मुद्दा चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घ्या...

social share
google news

EVM : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामुळे ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम उघडण्यासाठी ओटीपी ज्या फोनवर येतो तो फोन वायकरांच्या नातेवाईकांनी वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. अर्थात ईव्हीएम ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही ओटीपीची गरज नाही असं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. अर्थात असं असलं तरी पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशी चर्चा सुरु झाली आहे. ()

जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ईव्हीएम वापरू नये, कारण ते हॅक केले जाऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर भारताचे माजी मंत्री आणि आयटी तज्ञ राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या दावा खोडून काढला, त्यांचं म्हणणं होतं की भारतातील ईव्हीएम हे वेगळ्या बनावटीचे आहेत. त्यासाठी इंटरनेट किंवा कुठल्या नेटवर्कची गरज पडत नाही. 

चंद्रशेखर यांच्या दाव्यानंतर एलॉन मस्क यांनी त्यांना प्रतिक्रिया दिली आणि काहीही हॅक होऊ शकतं असा दावा केला. या दाव्यानंतर विरोधकांकडून इलेक्शन कमिशनला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आलं. त्याचबरोबर ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वायकरांच्या मेहुण्याला मोबाईलसह रंगेहाथ पकडणाऱ्या उमेदवाराने सांगितली Inside Story 

त्यामुळे खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? हे आम्ही सायबर तज्ञांकडून समजावून घेतलं. पुण्यातले सायबर एक्सपर्ट रोहन न्यायाधीश यांच्याशी आम्ही संपर्क केला. रोहन न्यायाधीश यांनी अनेक दाव्यांवर उत्तर दिलं. 

कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशिन हॅक केली जाऊ शकते यावर बोलताना न्यायाधीश म्हणाले,

‘पहिल्यांदा इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल वस्तू यातील फरक समजावून घ्यायला हवा. तुमच्या घरातील एकादी इलेक्ट्रीक वस्तू हॅक होऊ शकते का? उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घरातील मिक्सर हॅक होऊ शकत नाही. तुमची एखादी जुनी कार हॅक होऊ शकत नाही. ज्या गाड्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्ही आहे त्या गाड्या अक्सेस केल्या जाऊ शकतात, परंतु हॅक करता येऊ शकत नाही. त्यामुळे एखादी स्टॅण्ड अलोन इलेक्ट्रिक वस्तू ही हॅक होऊ शकत नाही. कुठलीही स्टॅण्ड अलोन वस्तू ही बाहेरुन ऑपरेट किंवा हॅक केली जाऊ शकत नाही.

न्यायाधीश यांनी कुठल्या वस्तूंना ओटीपी लागू शकतो याबाबत देखील स्पष्टीकरण दिलं. ‘जिथे रेंज असते म्हणजेच सिम किंवा इंटरनेटची कनेक्टिव्हीटी असते तिथे ओटीपी लागू शकतो. रेंजची गरज नसललेल्या वस्तूला मात्र ओटीपीची गरज लागत नाही.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसचं पारडं जड, पण, 'या' गोष्टीचा भाजपला फायदा होणार?

दरम्यान विरोधकांनी आरोप केल्यानंतर ईव्हीएम ही स्टॅण्ड अलोन मशीन असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. त्याचबरोबर जो फोन वापरण्यात आल्याचा आरोप केला जातोय तो डेटा एन्ट्रीसाठी असल्याचं देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

त्यामुळे येत्या काळात ईव्हीएमबाबत कुठले दावे केले जातात आणि कुठलं सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT