Ravindra Waikar : वायकरांच्या मेहुण्याला मोबाईलसह रंगेहाथ पकडणाऱ्या उमेदवाराने सांगितली Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

ravindra waikar kin using mobile catch bharat shah told inside story conting center mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi amol kirtikar
हिंदु समाज पार्टीच्या भरत शाह यांनी देखील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची जागा लढवली होती.
social share
google news

Bharat Shah On Ravindra Waikar Result  : दिपेश त्रिपाठी, मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) 48 मतांनी विजयी ठरले होते. वायकरांच्या या अटीतटीच्या विजयानंतर मोठा वाद पेटला आहे. त्यात मतमोजणी केंद्रावरून वायकरांच्या मेहुण्याने मोबाईल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे हे प्रकरण खूपच तापलं आहे. त्यात आता वायकरांच्या मेहुण्याला मतमोजणी केंद्रावर मोबाईलसह रंगेहाथ पकडणाऱ्या हिंदु समाज पार्टीच्या भरत शाह यांनी 'त्या' दिवशी मतमोजणी केंद्रावर घडलेल्या घटनेची संपूर्ण इनसाईड स्टोरी सांगितली आहे. (ravindra waikar kin using mobile catch bharat shah told inside story conting center mumbai north west lok sabha result ruturning officer vandana suryvanshi amol kirtikar)

ADVERTISEMENT

हिंदु समाज पार्टीच्या भरत शाह यांनी देखील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची जागा लढवली होती. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी उमेदवार म्हणून ते देखील मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. या भरत शाह यांनी आजतकशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. 

माझ्यासमोर खोलीचे सील उघडे गेले होते. दुपारी 2 वाजल्यानंतर वायकर आणि कीर्तिकर यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु झाली होती. त्यावेळेस मी पाहिले की, वायकरांची मुलगी आणि मेहुणा सतत मोबाईलवर मेसेज करत होते. त्यावेळेस मुलीकडे मोबाईल असल्याने आम्ही काहीच बोललो नाही, पण जसा मोबाईल हा मेहुण्याजवळ गेला, तसं आम्ही त्याला पकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर नेले असे भरत शाह यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पंकजा मुंडे कडाडल्या, CM शिंदेंची कोंडी...नेमकं काय घडतंय?

रवींद्र वायकर यांचा मेहुणा मतमोजणी केंद्रावर मतमोजणी एजंट म्हणून उपस्थित होता. त्याच्याजवळ आयडी कार्ड देखील होते.पण मी त्याला फोन वापरताना पाहताचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे घेऊन गेलो. यावेळी आम्ही अधिकाऱ्याला हा मोबाईल कुठुन आला? या मोबाईलची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली, असे भरत शाह यांनी सांगितले. या मागणीवर अधिकाऱ्याने आम्हाला वायकरांच्या मेहुण्याला बाहेर पोलिसांकडे नेण्यास सांगितले. आम्ही पोलिसांना त्याला ताब्यातही दिले, पण 5 तास उलटूनही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही, असे भरत शाह यांनी सांगितले.  

आम्ही 5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो. या दरम्यान जेव्हा जेव्हा पोलिसांना फोन यायचा, तेव्हा ते बाहेर जाऊन फोनवरून बोलून यायचे. खरं तर लगेचच हा फोन सील करायला हवा होता, पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे आम्हाला फोन बदलल्याचा संशय येतोय, असे भरत शाह यांनी सांगितले. आम्ही गुन्हा नोंदवायला सांगताच, आम्हाला उद्या येण्यास सांगितलं. पोलिसांनी अर्ज देण्यास सांगितल्यावर आम्ही लगेच अर्जही दिला. या दरम्यान आम्ही सतत पोलिस ठाण्यात जात होतो पण आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि प्रभारींनी रजा घेतली,असे शाह यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

FIR कधी दाखल झाला? 

आम्ही 4 तारखेला फिर्याद दिली होती, मात्र ती 13 तारखेला नोंदवण्यात आली. पण ती आमच्या तक्रारीच्या आधारे न करता तहसीलदारांच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आली होती. आणि त्यात आम्हाला साक्षीदार करण्यात आले होती. त्यामुळे आमची तक्रार का दाखल केली नाही? असे विचारले असता, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच तक्रार दाखल केल्याचे आरो मॅडम यांनी सांगितले. आम्ही एफआयआरची प्रत मागितली असता, आम्हाला न्यायालयातून एफआयआर घेण्याचे सांगण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : राहुल गांधींनी सोडली वायनाडची खासदारकी, काँग्रेसकडून 'मोठ्या' नेत्याला तिकीट!

आम्हाला 3 ते 4 वेळा आरो मॅडमने सांगितले की, आम्ही पोलिसांशी बोलत आहोत, जी काही चर्चा करायची आहे, ती आम्ही पोलिसांसोबत करू, यावेळी त्यांनी कोणतीही उत्तरे देण्याची तयारी दाखवली नाही,असे शाह यांनी सांगितले. काल आम्ही पोलीस ठाण्यात गेलो मात्र राजभर रजेवर गेले असून आम्हाला तुमच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण आम्हाला कसा तरी केस नंबर मिळाला आहे, आता आम्ही कोर्टात लढाई लढू असे शाह यांनी सांगितले.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT