OBC Reservation : पंकजा मुंडे कडाडल्या, CM शिंदेंची कोंडी...नेमकं काय घडतंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pankaja munde dhananjay munde meet laxman hake and navnath waghmare obc reservation mahayuti government
प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्याची आवश्यकता आहे.
social share
google news

Pankaja Munde On OBC Reservation : गौरव साळी, जालना :  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री भागात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकाही नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस होता. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी महायुती सरकारलाच घेरलं. (pankaja munde dhananjay munde meet laxman hake and navnath waghmare obc reservation mahayuti government) 

प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मी त्यांना न्याय देण्यासाठी आली आहे. माझ्या वंचित समाजाची आवाज सरकार ने ऐकायलाच पाहिजे, असा माझा आग्रह आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, हे आम्हाला समजावून सांगा, असी मागणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत सरकारलाच कोंडीत पकडलं. 

हे ही वाचा : राहुल गांधींनी सोडली वायनाडची खासदारकी, काँग्रेसकडून 'मोठ्या' नेत्याला तिकीट!

तसेच मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचे काम नाही, पण चुकीच्या पद्धतीने जर ओबीसी प्रमाणपत्र दिले जात असतील, जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं बोललं जात असेल तर सरकारने लेखी आश्वासन पत्र द्यावं, अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना भेट देण्यासाठी आलो आहे. मी जरी मंत्री मंडळात मंत्री असलो तरी भेट देताना माझी भावना आज वेगळी आहे. त्यामुळे मी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या मागण्या उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : 'जातगणना झालीच पाहिजे...', भुजबळांच्या मागणीने शिंदे सरकार कोंडीत?

आजपर्यंत ज्या ज्या आंदोलनाला राज्यात जो सन्मान मिळाला, तो सन्मान या आंदोलनाला मिळाला नाही, आंदोलनकर्त्याला ही मिळाला नाही. आमचा कोणाला ही कोणत्याही गोष्टी संबंधित आरक्षण देण्याबाबत विरोध नाही. ही भूमिका सरकारने वारंवार स्पष्ट केलीय.  पण सरकारने बहुसंख्य समाजाचा गैरसमज दूर केला पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT